Monday, December 29, 2025

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार

नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट क्षमतेच्या दुलहस्ती स्टेज-२ जलविद्युत प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मंजुरी मिळाल्यामुळे आता बांधकामासाठी लवकरच टेंडर जारी करण्यात येणार आहे.

पाकिस्तानकडून अनेक वर्षापासून सिंधू पाणी कराराचा हवाला जात होता; परंतु भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, सिंधू जल कराराच्या निलंबनामुळे भारताला पश्चिमेकडील नद्या अधिक स्वतंत्रपणे वापरण्याची मुभा मिळाली आहे. ज्यामुळे जलसुरक्षा आणि ऊर्जा उत्पादन मजबूत होईल. चिनाब नदीचे पाणी भारत-पाकिस्तान दरम्यान १९६० च्या सिंधू जल करारानुसार वाटले जात होते आणि प्रकल्पाचे सर्व मापदंड या कराराशी सुसंगत पद्धतीने ठरवले होते. तथापि, सिंधू पाणी करार २३ एप्रिल २०२५ पासून प्रभावीपणे निलंबित करण्यात आला. या करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवर अधिकार होते, तर भारताला रावी, ब्यास आणि सतलुजवर अधिकार होते. करार निलंबित झाल्यानंतर केंद्र सरकार सिंधू खोऱ्यातील सावलकोटे, रतले, बुरसर, पाकल दुल, क्वार, किरू आणि किर्थई यांसारख्या अनेक जलविद्युत प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. दुलहस्ती स्टेज-२ हा प्रकल्प ३९० मेगावॅट क्षमतेच्या विद्यमान दुलहस्ती स्टेज-१ प्रकल्पाचा विस्तार आहे. जो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) द्वारा २००७ मध्ये सुरु केला गेला होता आणि सध्या यशस्वीपणे कार्यरत आहे. या प्रकल्पानुसार, स्टेज-१ पावर स्टेशनमधील पाणी ३,६८५ मीटर लांब आणि ८.५ मीटर व्यासाच्या स्वतंत्र सुरंगमार्फत स्टेज-२ साठी डायव्हर्ट केले जाईल, ज्यामुळे घोड्याच्या नालासारखा तलाव तयार होईल.प्रकल्पात सर्ज शाफ्ट, प्रेशर शाफ्ट आणि भूमिगत पावरहाऊस यांचा समावेश आहे, ज्यात दोन १३० मेगावॅट क्षमतेच्या युनिट्स असतील.

Comments
Add Comment