मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सहा उमेदवारांचा समावेश आहे. याआधी मुंबई मनपासाठी भारतीय जनता पार्टीने १०५ तर उबाठाने ४२ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या व्यतिरिक्त मुंबई मनपासाठी काँग्रेसने ८७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, समाजवादी पक्षाने २१, आम आदमी पार्टीने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ३० डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी
- वॉर्ड ४० - आदित्य यादव
- वॉर्ड १०६ - संजय घरत
- वॉर्ड १०९ - सविता संतोष उत्तेकर
- वॉर्ड १३३ - प्रतिक्षा जाधव
- वॉर्ड १४२ - वनिता राजेंद्र नन्नावरे
- वॉर्ड २२६ - तुषार प्रभाकर आंब्रेकर






