मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळची तात्पुरती झलक म्हणून सुरुवातीची रॅली दुपारी घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स ३४५.९१ अंकाने घसरत ८४६९५.५४ पातळीवर व निफ्टी १००.२० अंकांने घसरत २५९४२.१० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घसरण कायम राहिली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाल्याने सेन्सेक्स ८४४१० व निफ्टी २६००० पातळी राखण्यास असमर्थ ठरले आहे. यासह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील केवळ वाढ मिडिया, एफएमसीजी, पीएसयु बँकेत कायम राहिली असून उर्वरित शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, ऑटो निर्देशांकात झाली आहे. व्यापक निर्देशांकातही स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप ५० निर्देशांकात घसरण झाली आहे.
आज सकाळी शेअर बाजारात किरकोळ वाढीनंतर जागतिक अस्थिरतेचा फटका म्हणून मोठ्या प्रमाणात बाजारात सेल ऑफ झाले आहे. परिणामी मध्यसत्रात शेअर बाजार ५०० अंकापेक्षा अधिक पातळीवर घसरत नंतर तुलनात्मकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात सावरले आहे. विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ६.२२% राहिला आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व तसेच युएस बाजारातील कपातीची वाढवेली शक्यता ज्यामुळे वाढलेला डॉलर, तसेच घरगुती गुंतवणूकदारांनी दाखवलेली सावधगिरी, नफा बुकिंग, सेल ऑफ अशा संमिश्रित प्रतिसादामुळे शेअर बाजारात अनास्था कायम राहिली असून तसेच आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात वाढ झालेली असूनही क्षेत्रीय निर्देशांकातील अनास्था आज विशेष जाणवली आहे. खासकरून सकाळच्या सत्रातील आयटी शेअर्समध्ये झालेली वाढ घसरणीत बदलल्याने बाजाराला सपोर्ट लेवल राखण्यासही अपयश आले आहे.
आशियाई बाजारातील अखेरचे सत्र संमिश्र स्तरावर पोहोचले आहे. गिफ्ट निफ्टी (०.४२%) सह अनेक इतर निर्देशांकात घसरण झाली ज्यामध्ये सर्वाधिक घसरण हेंगसेंग (०.७४%), निकेयी २२५ (०.६६%), सेट कंपोझिट (०.४२%), निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ जकार्ता कंपोझिट (१.२३%), शांघाई कंपोझिट (०.०४%), तैवान वेटेड (०.८८%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१२%) बाजारात वाढ झाली असून उर्वरित एस अँड पी ५०० (०.०३%), नासडाक (०.०७%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (१०.०१%), एचईजी (७.२३%), एचएफसीएल (५.५०%), एससीआय (४.०१%), मदर्सन वायरिंग (३.७४%), इमामी (३.४०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आयआरएफसी (५.४५%), रेल विकास (५.२५%), क्राफ्ट्समन ऑटो (४.७२%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.८२%), किर्लोस्कर ऑईल (३.७२%), आयएफसीआय (३.७१%), अनंतराज (३.७१%), रिलायन्स पॉवर (३.३९%), फिनोलेक्स केबल्स (३.२६%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तीव्र विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक महत्त्वाचे आधार स्तर टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरला. निफ्टी निर्देशांकाने २६१०६ पातळीचा दिवसाचा उच्चांक गाठला, परंतु त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला, ज्यामुळे निर्देशांक घसरून २५९२४ पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला आणि २६००० पातळीचा महत्त्वाचा तांत्रिक व मानसिक आधार निर्णायकपणे तोडला. क्षेत्रीय पातळीवर, मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर्सनी सापेक्ष ताकद दाखवली आणि ते तेजीमध्ये व्यवहार करत होते, ज्यामुळे त्यांनी व्यापक बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली. याउलट, रिअल्टी, आयटी, हेल्थकेअर, ऊर्जा आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय कमजोरी दिसून आली आणि ते संपूर्ण सत्रात दबावाखाली राहिले. आज नंतर जाहीर होणाऱ्या भारताच्या औद्योगिक आणि उत्पादन उत्पादन आकडेवारीच्या प्रतीक्षेत बाजारातील सहभागींनी मोठ्या प्रमाणात सावध भूमिका घेतली होती, ज्यामुळे नजीकच्या काळातील आर्थिक दृष्टिकोनाबद्दल संकेत मिळण्याची अपेक्षा आहे.
या सत्रात चांदी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिली. एमसीएक्सवर २५४८५३ पातळीचा उच्चांक गाठल्यानंतर, चांदीच्या किमतींमध्ये नफावसुली झाली आणि त्यात सुमारे १.३८% ची घट झाली, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या क्षेत्रात सावध भावना दिसून आली. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, बाजाराची स्थिती स्पष्टपणे मंदीचे संकेत देत होती, ज्यात १६० शेअर्सच्या घसरणीच्या तुलनेत केवळ ५२ शेअर्समध्ये वाढ झाली. अल्केम लॅबोरेटरीज, एनएमडीसी, सेल,पेट्रोनेट एलएनजी आणि कमिन्स इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जे या शेअर्समध्ये वाढलेल्या डेरिव्हेटिव्ह व्यवहारांचे संकेत देते. निफ्टी ऑप्शन्स सेगमेंटमध्ये, २६००० आणि २६१०० स्ट्राइक किमतींवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट होता, तर पुट बाजूला, २५९०० आणि २६००० स्ट्राइकवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट होता, जे बाजारातील सहभागींनी लक्ष ठेवलेल्या महत्त्वाच्या पातळ्या अधोरेखित करते.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' बाजारात पुढील तेजीसाठी आवश्यक घटकांची कमतरता दिसत आहे आणि बहुतेक गुंतवणूकदार सुट्टीच्या मनःस्थितीत असल्याने, नजीकच्या काळात बाजारात स्थिरीकरणाचा टप्पा येण्याची शक्यता आहे. २०२६ साठीचा दृष्टिकोन सकारात्मक असला तरी, आता लक्ष आगामी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबाबतच्या स्पष्टतेवर केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि रुपयाच्या घसरणीच्या वातावरणात, गुंतवणूकदार त्यांच्या तुलनेने अधिक सुरक्षिततेसाठी आणि मजबूत कमाईच्या स्पष्टतेसाठी लार्जकॅप शेअर्सना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सत्रादरम्यान निर्देशांकात नफावसुली दिसून आली, ज्यामुळे बाजारात घसरण झाली. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, निर्देशांक या पातळीच्या खाली घसरल्याने २६००० पीई पुट रायटर्सनी आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. निर्देशांक २१ ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) खाली गेल्याने बाजाराचा कल कमकुवत झाला आहे; याव्यतिरिक्त, त्याने मागील वाढीपैकी ५०% पेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे, ज्यामुळे अलीकडील तेजीच्या टिकाऊपणाबद्दल शंका निर्माण झाली आहे. घसरणीच्या बाजूने, २५९०० वर आधार पातळी आहे, तर तेजीच्या बाजूने, २६००० ची पातळी सुरुवातीचा अडथळा म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'






