Sunday, January 18, 2026

पाकिस्तानात माजी लष्करी अधिकारी आदिल राजा 'दहशतवादी' घोषित

पाकिस्तानात माजी लष्करी अधिकारी आदिल राजा 'दहशतवादी' घोषित

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान इमरान खान यांचे समर्थक आणि माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांना देशविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) पसरवल्याच्या आरोपाखाली दहशतवादी घोषित केले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने या आठवड्यात सांगितले की, आदिल राजा यांना दहशतवादविरोधी कायदा अंतर्गत प्रतिबंधित व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचा आरोप आहे की आदिल राजा परदेशात बसून पाकिस्तानविरोधी प्रचार मोहीम चालवत होते. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या महिन्यात इस्लामाबादमध्ये ब्रिटनच्या उच्चायुक्त जेन मॅरियट यांची भेट घेऊन आदिल राजा यांच्या प्रत्यार्पणासंदर्भातील कागदपत्रे औपचारिकरीत्या सुपूर्द केली. मात्र, या प्रकरणावर ब्रिटन सरकारकडन अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment