मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आज तुफान घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणात जागतिक कमोडिटी बाजारपेठेत अस्थिरता वाढल्याने सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या तुलनेत डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने काही पातळीवर सलग सहा वेळा वाढलेल्या सोन्याचांदीला आज ब्रेक मिळाला ज्याचे पुनर्वसन घसरणीत झाले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २०२ रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १८५ रुपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५२ रुपयाने घसरण झाली. परिणामी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४०४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२८७० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३० रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २०२० रूपयाने, २२ कॅरेट प्रति तोळा किंमतीत १८५० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२५० रूपयाने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४०४०० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १२८७०० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३०० रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४०४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२८७० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३० रूपयांवर पोहोचले आहेत.
भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक २.५९% घसरण झाल्याने दरपातळी २३३५७५ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.४५% घसरण झाल्याने दरपातळी ४४८७.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत १.४७% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ४४६५.४० औंसवर गेली आहे.
सोन्यात घसरण का झाली?
सोन्यात आज प्राईज करेक्शन झाले आहे. सलग सहा सत्रात नव्या उच्चांकानंतर जागतिक अस्थिरता असतानाही युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाल्याने बाजारात सकारात्मकता भावना व्यक्त केल्या गेल्या. चार वर्ष सुरू असलेल्या रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला मध्यस्थी करून मार्ग काढू अशा आशयाचे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याने कमोडिटी बाजारातील अस्थिरतेला किरकोळ दिलासा मिळाला. दरम्यान डॉलरच्या निर्देशांकातही मोठी वाढ झाली असल्याने सोन्याच्या निर्देशांकात दबाव कमी झाला. दुसरीकडे युएस बाजारातील तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारी अपेक्षेहून अधिक पातळीवर वाढल्याने बाजारातील आत्मविश्वास वाढला गेला होता. यासह गोल्ड फ्युचर निर्देशांकातील व्यापारही मर्यादित झाल्याने मागणी घसरली. यासह युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीत संमिश्र मतप्रवाह असताना तिसऱ्या मजबूत जीडीपी आकडेवारीमुळे पुन्हा दरकपातीचे वेध गुंतवणूकदारांना लागले आहे. ए आय तंत्रज्ञानाच्या शेअरने चांगली कामगिरी केल्यानंतर कमोडिटीतील अस्थिरता तूर्तास कमी झाली.
१९७९ नंतर सोन्याने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर सोने कालपर्यंत ७०% अधिक पातळीवर इयर टू डेट (YTD) व्यवहार करत होते. तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेची आर्थिक वाढ लवचिक राहिली असून जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन Gross Domestic Product) मागील कालावधीपेक्षा अधिक वेगाने वाढले असताना लेबर मार्केटमध्ये (श्रम बाजाराच्या) निर्देशकांनी नोकरी निर्मिती सुरू असल्याचे मात्र हळूहळू मंदावत असल्याचे संकेत दिले. धोरणकर्त्यांमध्ये मतभेद असूनही महागाई कमी होत असल्याने आणि रोजगाराची परिस्थिती नरमल्याने, बाजारपेठा २०२६ मध्ये दोन व्याजदर कपातीची शक्यता गृहीत धरत आहेत.अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित तेल टँकरवर नाकेबंदी केल्यानंतर भूराजकीय जोखमींमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला आणखी चालना मिळाली असून देखील बाजारातील गुंतवणूकीला काही काळ स्थैर्यता मिळाली असून गुंतवणूकदारांनी ईटीएफ व सोन्याच्या गुंतवणूकीत आपले नफा बुकिंग देखील वाढवले आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण कायम !
चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ४ रूपयांनी, तर प्रति किलो दरात ४००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५८ तर प्रति किलो दर २५८००० पातळीवर स्थिरावला आहे. आज चांदीत मोठी घसरण होऊनसुद्धा चांदीने आपली २५५००० पातळी कायम राखण्यासाठी यश मिळवले आहे. मोठ्या प्रमाणात दरकपातीच्या वाढलेल्या शक्यता जाग्या झाल्या असताना दुसरीकडे सुधारित जीडीपी आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांनी सिल्वर स्पॉट व्यवहारात घसरण केली असल्याचे दिसून येत आहे. सोन्याप्रमाणे डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने चांदीतील दबाव कमी झाला आहे.
मात्र भूराजकीय तणावामुळे बाजारातील भावनांना आणखी पाठिंबा मिळाला असताना अमेरिकेने निर्बंध घातलेल्या व्हेनेझुएलाच्या तेल टँकरवर नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहाटेपर्यंत चांदीतही दबाव कायम होता मात्र १ तासात उच्चांकी पातळीवरून चांदीने २१००० ते २२००० रूपये प्रति किलो घसरण केली होती. चांदीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने हा पट्टा चांदीला बसला आहे. कमोडिटी बाजारात जोखीम वाढली असताना व्यवहार व मागणी कमी झाल्याने पुन्हा एकदा चांदीचे दर स्थिरावले आहेत. या वर्षात आतापर्यंत, चांदीच्या किमतीत जवळपास १४९% वाढ झाली आहे ज्याला पुरवठ्यातील संरचनात्मक कमतरता, मजबूत औद्योगिक मागणी आणि अमेरिकेने त्याला एक महत्त्वपूर्ण खनिज म्हणून घोषित करणे या घडामोडींमुळे चांदीला आज सपोर्ट लेवल मिळाली आहे. यासह आणखी एक परिणामकारक घडामोड म्हणजे चीन बाजारातील चांदीचा साठा एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचल्याने पुरवठ्यासंबंधीच्या चिंता अधिक तीव्र झाल्या आहेत.
अखेरच्या सत्रात मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २५८० प्रति किलो दर २५८००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.५९% घसरण झाल्याने दरपातळी २३३५७५ पातळीवर घसरण झाली.






