Monday, December 29, 2025

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. दुसरीकडे पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पण निकषांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आता योजनेच्या निकषांनुसारच ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा