Monday, December 29, 2025

तांब्याच्या मागणीमुळे हिंदुस्थान कॉपर शेअर्सचा रेकोर्डवर रेकोर्ड! गुंतवणूकदारांसाठी पुढे काय स्ट्रॅटेजी? वाचा

तांब्याच्या मागणीमुळे हिंदुस्थान कॉपर शेअर्सचा रेकोर्डवर रेकोर्ड! गुंतवणूकदारांसाठी पुढे काय स्ट्रॅटेजी? वाचा

मोहित सोमण: हिंदुस्थान कॉपर (Hindustan Copper) शेअर्समध्ये आज सलग सातव्यांदा वाढला असल्याने कंपनीचा शेअर सत्राच्या सुरुवातीलाच ११% पेक्षा अधिक पातळीवर उसळल्याने ५४५.९५ रूपये प्रति शेअरवर उसळला होता. सत्र सुरूवातीला कंपनीचा शेअर ५४५.०५ रूपयांवर उघडला होता. त्यामुळे एका आठवड्यात कंपनीचा शेअर ३७ ते ४०% उसळला असून गेल्या तीन आठवड्यात कंपनीचा शेअर ४ महिन्यात दुप्पट दरावर पोहोचला आहे. या कारणामुळे कंपनीचे बाजार बाजार भांडवल (Market Capitalisation) ५०००० कोटींच्यावर गेले आहे. सातत्याने कमोडिटी बाजारात सोने चांदी, व तांबे (Copper) यांच्या किंमतीत तुफान वाढ होत असल्याने त्याचा मोठा परिणाम शेअरवर जाणवला आहे. आज कॉपरने ७% अधिक पातळीवर उसळल्याने शेअर बाजारात नवा विक्रम प्रस्थापित केला.

न्यूयॉर्क येथील कमोडिटी बाजारात कॉपर कॉमेक्स शुक्रवारच्या ५% उसळीला मागे टाकत आणखी १.२०% उसळल्याने दरपातळी १३००० डॉलर टनवर पोहोचले. दुपारी १ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २.२% वाढ झाल्याने दरपातळी ४८८.५५ रूपये प्रति शेअर सुरु आहे. युएस बाजारातील अस्थिरता, वाढलेली औद्योगिक मागणी व ईपीएफ गुंतवणूकीत वाढीसह युएस व्हेनेझुएला यांच्यातील तसेच युएसकडून आयसिस तळावर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chains) परिणाम झाल्याने आणखी महागले आहे. कमोडिटी बाजारात डिसेंबर फ्युचर निर्देशांकात तांब्याची किंमत ९% उच्चांकावर पोहोचल्याने १२९६० प्रति डॉलर टनवर पोहोचली आहे.

दरम्यान तज्ञांच्या मते, जागतिक तांब्याच्या किमतींनी लंडन मेटल एक्सचेंजवर (LME) प्रथमच प्रति टन १२००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून त्या एक्सचेंजवर आणखी वाढ होत राहील असा कयास आहे. त्यांनी सध्याच्या या दरवाढीचे कारण चिली आणि इंडोनेशियासारख्या प्रमुख उत्पादक प्रदेशांमधील पुरवठ्याच्या आव्हानांनाही दिले असून पर्यावरणीय अडथळे आणि कार्यात्मक समस्यांमुळे जागतिक बाजारपेठेत तांब्याचा पुरवठा मर्यादित झाला आहे असे म्हटले.

जागतिक गुंतवणूक बँक जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत तांब्याची किंमत प्रति दशलक्ष टन १२५०० डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण वर्षासाठी सरासरी किंमत १२०७५ डॉलर्स प्रति टन राहू शकतो. जे.पी. मॉर्गनने असेही निदर्शनास आणून दिले की, चीनची मागणी तांब्याच्या किमतींना आणखी आधार देऊ शकते. पूर्वीच्या तेजीच्या काळात, जेव्हा चीनची मागणी कमकुवत झाली होती, त्या तुलनेत सध्याची परिस्थिती वेगळी दिसत आहे, आणि मजबूत मागणी अशीच सुरू राहण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, अमेरिकेच्या संभाव्य शुल्कांबद्दलच्या अनिश्चिततेमुळे तांब्याच्या किमती अधिक पातळीवर टिकून आहेत.

आगामी दिवसात कॉपरची दिशा गुंतवणूकदारांसाठी काय असेल?

यावर आपले मत मांडताना जागतिक स्तरावर तांब्याच्या मूलभूत बाबी अनुकूल राहिल्या आहेत असे गोल्डमन सॅक्सने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. कमोडिटीज ट्रेडिंग दृष्टीने तांब्याला पसंतीचा औद्योगिक धातू म्हणून घोषित केले कारण विद्युतीकरणासाठी जागतिक मागणीतून बहुतांश भागात तांबे वापरले जाते. यासह संस्थेने आपल्या अहवालात एआय डेटा सेंटर्स, नवीकरणीय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि पॉवर ग्रिड पायाभूत सुविधांसारख्या वाढीच्या घटकांकडे लक्ष वेधले असून गोल्डमन सॅक्सने तांब्याच्या पुरवठा-संबंधित आव्हानांकडेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, खाणींमधून होणारा पुरवठा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत केंद्रित आहे व अशा मर्यादांना जगाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाढलेल्या मागणीचा प्रमाणात उत्पादन वेगाने वाढवण्याची क्षमता मर्यादित होते असे म्हटले तांब्याच्या किमतींमध्ये आधीच मोठी वाढ झाली असली तरीही संस्थेच्या मते, २०२६ मध्ये किमती स्थिर होऊ शकतात आणि सरासरी ११४०० प्रति डॉलर टन राहतील. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अमेरिकेकडून अंदाजे १.५ दशलक्ष टन साठवलेल्या मालाचा वापर सुरू झाल्यावर तांब्याच्या किमतींवर दबाव येऊ शकतात.

Comments
Add Comment