Monday, December 29, 2025

बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आणि राशपचे आस्ते कदम, जाहीर केली पहिली यादी

बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आणि राशपचे आस्ते कदम, जाहीर केली पहिली यादी

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी मुंबईसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिकेतील २२७ पैकी ६२ जागांवर वंचित लढेल आणि उर्वरित जागांवर काँग्रेस किंवा त्यांच्या सहमतीने मित्र पक्ष लढतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे. या घोषणेनुसार उर्वरित १६५ पैकी ८७ जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसचे आणखी उमेदवार पुढील काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फक्त सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेस - वंचित आघाडीचे सूत्र कळल्यापासून खासदार वर्षा गायकवाड नाराज असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईसाठीची ८७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आतापर्यंत ९१ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, समाजवादी पक्षाने २१ आणि आम आदमी पार्टीने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उबाठाने आतापर्यंत ४२ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा