Monday, December 29, 2025

कॉमर्स इंडस्ट्रीला एआयने फक्त टूल नाही तर परिपूर्ण एजंट म्हणून बदलून टाकल !

कॉमर्स इंडस्ट्रीला एआयने फक्त टूल नाही तर परिपूर्ण एजंट म्हणून बदलून टाकल !

मुंबई: तुमचे दैनंदिन आयुष्य ए आय बदलत आहे. केवळ ए आय हे टूर राहिले नसून तुमचा दैनंदिन जीवनाचा भागीदार ए आय अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) झाला आहे. मात्र या वर्षात विशेषतः एआयचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने ए आय केवळ एखादे फिचर्ससाठी सहकार्य करणारे टूल नाही. ए आय प्रत्येक दैनंदिन कामकाजात असिस्टंट म्हणून काम करू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर एक अहवाल प्रकाशित झाला आहे ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वाणिज्य क्षेत्रात (Commerce Industry) केवळ वस्तू खरेदी करण्यासाठी टूल म्हणून कामात येणार नसून व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून वस्तूंच्या खरेदी विक्रीत सहकार्य करत आहे. ते उत्पादन केवळ सूचवत नसून ऑपरेशनल कॉमर्समध्येही सहकार्य करत असल्याचे निरिक्षण ग्लोबल पेमेंटस आयएनसी (Global Payments Inc) या अहवालात स्पष्ट झाले. अहवालातील माहितीनुसार, ते केवळ टूल नाही तर ग्राहकांनी यापूर्वीच संशोधन करणारे, सूचवणारे, संकलन करणारे असिस्टंट ठरले आहे ही तर केवळ ए आय संक्रमण (AI Transformation) असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

एआयचा वापर सध्या केवळ वाणिज्य विभागात नाही तर घरकाम करण्यापासून आर्थिक व्यवहार बघण्यासाठी, पेमेंट प्रणाली वापरण्यासाठी, लॉजिस्टिक्स, ट्रॅव्हलिंग, ब्रँड आयडेंटिटी अशा जवळपास सगळ्याच क्षेत्रात होत असल्याचे अहवालाने नमूद केले. याविषयी व्यक्त होताना अहवालात नमूद केले गेले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आणखी एक उदयोन्मुख उपयोग घरगुती व्यवस्थापनात आहे. उदाहरण देत अहवालात म्हटले आहे की, एक व्यस्त कुटुंबप्रमुख एआय (AI) एजंटला साप्ताहिक जेवणाचे नियोजन करण्यास, पाककृती सुचवण्यास आणि मागील खरेदी तसेच त्यांची ब्रँडची पसंती कुठली असू शकते व बजेटच्या मर्यादा वापरून खरेदीची यादी तयार करण्यास सांगू शकतो.पेमेंटशी जोडलेल्या एजेंटिक कॉमर्समुळे, एआयकडून पुन्हा मंजुरी किंवा पेमेंटची माहिती न मागता थेट डिलिव्हरी एआय माध्यमातून ग्राहक ऑर्डर देऊ शकतो.

यासह एआय एजंट मालकांच्या वतीने मागणी पुरवठा व्यवस्थापित करणे, सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण करणे किंवा रद्द करणे,देखभालीच्या गरजांवर देखरेख ठेवणे आणि पुरवठादार व गिग कामगारांना पेमेंट करण्याची प्रक्रिया युजर करू शकतात असेही स्पष्टीकरण या अहवालात देण्यात आले आहे. हे व्यवहार टोकनाइज्ड खरेदीद्वारे पूर्ण केले जाऊ शकतात, ज्यामुळे पारदर्शकता आणि सुरक्षा सुधारते. सुरुवातीला, व्यवसायांनी प्रामुख्याने ग्राहक सेवेसाठी ए आयचा अवलंब केला. नैसर्गिक भाषा साधनांचा वापर करून प्रश्नांची उत्तरे दिली आणि वैयक्तिकृत शिफारसी दिल्या ज्यामुळे खर्च कमी झाला आणि ग्राहकांचा सहभाग वाढला. मागणीचा अंदाज आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनासारख्या बॅक ऑफिस कार्यांना बळ देण्यासाठी देखील ए आयचा वापर केला गेला आहे असे अहवालात म्हटले आहे.तरीदेखील अलीकडच्या काही महिन्यांत ग्राहकांसाठी एक स्वायत्त एजंट म्हणून एआयची भूमिका लोकप्रिय होऊ लागली आहे.

अहवालातील सर्वेक्षणानुसार, व्यवसायांमध्ये एजेंटिक कॉमर्सबद्दलची जागरूकता आधीच जास्त आहे, १५% लोकांनी सांगितले की ते या संकल्पनेशी खूप परिचित आहेत आणि ७२% लोकांनी सांगितले की ते काही प्रमाणात परिचित आहेत. पुढील टप्प्यात एआय एजंट अतिरिक्त परवानगीशिवाय किंवा पेमेंट तपशिलांची पुन्हा पुन्हा नोंद न करता खरेदी करतील. ग्राहक क्षेत्रावर बोलताना अहवालात पुढे म्हटले आहे की, आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंटना सात दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करण्यास, निश्चित बजेटमध्ये विमान भाडे आणि हॉटेल्स शोधण्यास, आरक्षण सुरक्षित करण्यास, अनामत रक्कम जमा करण्यास, स्पा उपचारांचे वेळापत्रक ठरवण्यास, युजरची शैलीनुसार शिफारसी करण्यास व ब्रँडची पसंती आणि अलीकडील कपड्यांच्या खरेदीनुसार कपडे खरेदी करण्यास देखील एआय माध्यमातून निर्देशित केले जाऊ शकते.

एजेंटिक कॉमर्सकडून चांगला ग्राहक अनुभव, सुधारित सेवा आणि मजबूत व्यावसायिक संबंध मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, तंत्रज्ञान विकसित होत असताना आव्हाने आणि धोके कायम आहेत असेही अहवालाने यावेळी स्पष्ट केले आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात वाढता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर पाहता या वर्षात युजरला मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातील बदल अपेक्षित आहे असे म्हटले जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >