मना घडवी संस्कार

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


“मना सज्जना” मन सज्जन आहे. पण या मनात अविचारी, विकारी, चंचल-अतिचंचल मनाचे विचारच मनाला अशुद्ध बनवतात. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणतात, या मनाला लगाम घाला बेछूट चालले कोठे? वाचाळता कुठे? विचार, अन्याय, अत्याचार, दांभिकता हे सर्व मनावर अधिराज्य करत आहेत. मग ते वर्तन बिघडते.


“मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनी कुडी वासना सांडीवेगी
बळे लागला काळ हा पाठी लागी.”


मन हे शुद्ध ठेवावे. जर त्यात पाप बुद्धी आली की, भलेभलेही गेले. रावणाचे काय झाले? आपण किस झाड की पत्ती. लोग माया सोड द्वेष, मत्सर, अज्ञान, पाप, लबाडी, फसवणूक, कोणाचे वाईट चिंतन इ. गोष्टी घडतात. ते या अशा बाधित मनामुळेच! या श्लोकामध्ये रावणाचे उदाहरण दिले आहे. रावणाचे काय झाले? त्यासारखे जीवन न जगता आपण सन्मार्गाने जीवन जगले पाहिजे. तो असूर होता. मूळचा वाईट विचारांचा, त्याचा सर्वनाश झाला त्यास तोच पूर्ण जबाबदार, कारणीभूत आहे. या श्लोकात सन्मार्गाने जावे हे जीवनाचे तत्त्व समजावून सांगितले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत, जसे लोकांना पैसा लुबाडण्याची सवय असते. कोणाची प्रगती पाहवत नाही. कुणाचं भलं पाहवत नाही. मोह, माया, द्वेष, मत्सर, असूया, गर्व, घमेंड या वृत्तीने दुसऱ्या पुण्यवाण लोकांना त्रास दिला जातो. मुह मे राम बगल मे छूरी. असे म्हणतात ना! बोलतानाही आपण कोणाचे हृदय दुखवू नये, मन दुखवू नये. मनाला लागेल असे बोलू नये. कोणाच्या मर्मावर बोट ठेवू नये. निदान चांगले काही करता आले नाही, तर वाईट तरी करू नये. सन्मार्गाने जावे. असे वागावे.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंदिर तोडो, मज्जिद तोडो, लेकिन किसी का दिल ना तोडो. कोणी कोणी भांडणे लावतात, पैसे खातात, पैसे लुबाडतात, संसार उद्ध्वस्त करतात, नशा करतात, या श्लोकात समर्थ म्हणतात. प्रत्येकाचा जीवन काळ हा ठरलेला आहे. जीवनातील प्रत्येक क्षण तुम्हाला सन्मार्गाची प्रेरणा देत असतो. अहंकार, राग, दुटप्पीपणा गर्वाचे घर खाली असते. या सर्व गोष्टी विनाशाकडे घेऊन जातात. जे रावणाचे झाले म्हणून क्षमाशीलतेने जगा, कोणालाही दुखवू नका. स्वतःचे जीवन वाईट विचारांनी नष्ट करू नका. चांगल्या विचारांनी चांगले घडवा. आपल्या वाढत्या वयाबरोबर नक्कीच ज्ञान, आशा, आकांक्षा, स्वप्न, विचार, कर्म, कर्माचे फळ ही विवेक पूर्ण आणि प्रगल्भ, परिपक्व असावीत. तर जगण्यात राम येईल. लोभी रावण आणू नका. कोणाचेही वाईट चिंतू नका. देव सर्वत्र आहे आणि तो पाहतो आहे. सर्वांवर उत्तर


एकच काळ... बळी लागला काळ हा पाठी लागी. अशा सज्जन मनाला सज्जनच ठेवून सन्मार्गाकडे नेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मानवी जीवनाचे ते फलित आहे आणि ते आपल्याच हाती आहे. सत्कर्म, सत्संग, सदाचार आणि सद्गुण हे नेहमी माणसाला माणूस ठेवतात.

Comments
Add Comment

गाईमुळे वाघाचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणातील एका कथेनुसार प्राचीन काळी एक प्रभंजन नावाचा धर्मपरायण राजा

ट्रोलिंग : दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे!

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि समाजात

हम प्यार का सौदा करते हैं एक बार...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे काही गाणी लोकप्रिय होतात ती एखाद्या गायकाच्या गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात

मित्र नको; बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजमधल्या मुलांशी वागावं तरी कसं याबाबतीत मागील लेखात आपण किशोरावस्थेतील

सुधारणांच्या वाटेवर..

वेध : कैलास ठोळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारताने ‌‘रिफॉर्म एक्सप्रेस‌’मध्ये प्रवेश केला आहे.

सामान्य माणूस खरोखर दखलपात्र आहे?

दखल : महेश धर्माधिकारी  सामान्य माणसासाठी मतदान करणे हा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्यही असते. बोटाला शाई लावलेले