Sunday, December 28, 2025

स्मृती-शफालीची वादळी खेळी

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात फलंदाजीचा फॉर्म दाखवत निर्धारित २० षटकांत २ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर भारतीय सलामीवीरांनी श्रीलंकन गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी २२२ धावांचे कठीण आव्हान दिले. सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १६२ धावांची विक्रमी भागीदारी केली. ही भारतासाठी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृती मानधनाने पहिल्याच ओव्हरमध्ये २ चौकार लगावत भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली होती. तसेच तिला साथ देत शफाली वर्माच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने ११व्या षटकातच शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.स्मृती मानधनाने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारतासाठी सर्वाधिक षटकारांचा विक्रमही तिने नावावर केला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या वादळी खेळींच्या बळावर भारतीय संघाने दीडशेचा टप्पा ओलांडला. दरम्यान शफालीबरोबरीची भागीदारी संपुष्टात येताच स्मृती मानधनाही बाद झाली आहे. स्मृतीने ४८ चेंडूंत ८० धावांची खेळी केली. स्मृतीने ४८ चेंडूंत ८० तर शफालीने ४६ चेंडूंत ७९ धावांची खेळी केली. तर ऋचा घोषने या पायावर कळस चढवत १६ चेंडूंत ४० धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने १० चेंडूंत १६ धावा केल्या. मालिका विजयाकडे वाटचाल : पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत आधीच ३-० ने आघाडीवर आहे. आता श्रीलंकेसमोर विजयासाठी २२२ धावांचे कठीण आव्हान होते. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी प्रति षटक ११.१० च्या धावगतीने फलंदाजी करावी लागणार होती. ऋचा घोषचा फिनिशिंग टच : सलामीवीर बाद झाल्यानंतर रिचा घोषने शेवटच्या षटकांत आपली फटकेबाजी सुरू ठेवली. तिने केवळ १५ चेंडूंत नाबाद ३९ धावा कुटून भारताला २२० चा टप्पा पार करून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ५ धावा करून नाबाद राहिली.
Comments
Add Comment