Saturday, December 27, 2025

सेव्हन हिल्स हॉस्पिटलसाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली

सेव्हन हिल्स हॉस्पिटलसाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली

मुंबई : सेव्हन हिल्स हेल्थकेअरच्या मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल खरेदीसाठी रिलायन्स समूहाशी संबंधित एनके होल्डिंग्ज आणि ज्युपिटर हॉस्पिटल स्पर्धेत आहेत. इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दोन्ही कंपनींनी सुमारे ४५० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र रक्कम भरण्याच्या पद्धतीत फरक आहे. ज्युपिटरने दिवाळखोरी न्यायालयाच्या मंजुरीनंतर ३० दिवसांत ४५० कोटी रुपये भरण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर एनके होल्डिंग्जने ही रक्कम पाच वर्षांच्या कालावधीत भरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मुंबईतील हॉस्पिटलसाठी मुंबई महानगरपालिकेशी जमिनीच्या नुकसानभरपाईवर दीर्घकाळापासून कायदेशीर वाद सुरू आहेत. २०१८ मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात प्रकरण दाखल झाल्याने विक्री प्रक्रिया अडचणीत आली होती. दिवाळखोरी न्यायालयाने रुग्णालये स्वतंत्रपणे विकण्याची परवानगी दिली असून, सेव्हन हिल्सच्या मुंबईतील हॉस्पिटलचे भवितव्य अद्यापही अनिश्चित आहे. मुंबईतील हॉस्पिटलवर महानगरपालिकेकडून १४०.८ कोटी रुपयांच्या थकबाकी भाड्याची मागणीही सुरू आहे, त्यामुळे खरेदी प्रक्रियेत अद्याप अडथळे आहेत.

Comments
Add Comment