कॅलिफोर्निया : WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता कोणतेही वेगळे अॅप न वापरता WhatsApp वरच प्रोफेशनल पद्धतीने फोटो एडिट करता येणार आहे. WhatsApp iOS आणि अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये स्टेटस एडिटरमध्ये मेटा AI आधारित फोटो एडिटिंग टूल्सची चाचणी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
या नव्या फीचरमुळे स्टेटस तयार करताना युजर्स थेट WhatsApp मधूनच फोटो एडिट करू शकणार आहेत. सुरुवातीला अँड्रॉइड बीटामध्ये हे फीचर दिसून आले असून आता iOS बीटा (TestFlight) युजर्सनाही ते उपलब्ध होऊ लागले आहे. काही आयफोन युजर्सना स्टेटस तयार करताना नवीन एडिटिंग इंटरफेस दिसत असून त्यामध्ये पारंपरिक फिल्टर्ससोबत AI टूल्सचाही समावेश आहे.
https://faq.whatsapp.com/3894481717447270/?cms_platform=android&helpref=platform_switcherमेटा AI च्या मदतीने WhatsApp अॅनिमे, कॉमिक बुक, क्ले, पेंटिंग, 3D, कवाई, व्हिडिओ गेम अशा अनेक AI स्टाइल्सची चाचणी घेत आहे. या स्टाइल्स केवळ फिल्टर नसून AI फोटो पूर्णपणे नवीन स्वरूपात तयार करते. परिणाम पसंत न पडल्यास त्याच स्टाइलमध्ये पुन्हा फोटो जनरेट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
याशिवाय मेटा AI फोटोंमधून अनावश्यक वस्तू काढून टाकणे, नवीन घटक जोडणे, पार्श्वभूमी बदलणे तसेच स्थिर फोटोंना लहान अॅनिमेटेड क्लिपमध्ये रूपांतरित करण्याची सुविधाही देणार आहे. विशेष म्हणजे फोटो एडिट करताना पार्श्वभूमी नैसर्गिक ठेवली जाते, त्यामुळे फोटो अधिक व्यावसायिक दिसतो.
सध्या हे फीचर निवडक बीटा युजर्ससाठीच उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने विविध देश आणि युजर ग्रुपमध्ये रोलआउट केले जाणार आहे. एकूणच, या अपडेटमुळे WhatsApp स्टेटस लवकरच युजर्ससाठी मिनी क्रिएटिव्ह स्टुडिओ बनेल यात शंका नाही.






