Sunday, December 28, 2025

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी युवा भारतीय ब्रिगेडची घोषणा केली आहे. या संघ निवडीत मुंबईच्या आयुष म्हात्रेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया मध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी आयुष म्हात्रे भारताचे नेतृत्व करेल. विहान मल्होत्राची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. आयुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचे फळ त्याला कर्णधारपदाच्या रूपाने मिळाले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्यासाठी बिहारच्या वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा दुखापतीमुळे या दौऱ्यात उपलब्ध नसल्याने वैभवला ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ...असा आहे भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर. एस. अम्रिश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन. विश्वचषकाचे वेळापत्रक : यजमान : झिम्बाब्वे आणि नामिबिया कालावधी : १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६
Comments
Add Comment