मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा उसगावकर यापूर्वी स्टार प्रवाहवरच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' या मालिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी त्या 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन गाजवला होता. चित्रपट असो किंवा मालिका सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून आता त्या पुन्हा एकदा मालिका क्षेत्रात दिसणार आहेत.
वर्षा उसगांवकरांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेत नंदिनी शिर्केपाटील म्हणजेच 'माई' ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली होती. घराला जोडून ठेवणारी आणि गौरी-जयदीपला क्षणोक्षणी आधार देणाऱ्या माई भुमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेनंतर प्रेक्षक त्यांना छोट्या पडद्यावर प्रचंड मिस करत होते. त्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा छोट्या पडद्यावर वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत.
पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन कोठडीत आहे. बंडू आंदेकरला महापालिका ...
वर्षा उसगांवकर स्टार प्रवाहच्या 'नशीबवान' मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत सुद्धा त्या 'माई' म्हणूनच एन्ट्री घेणार आहेत. त्या गिरिजाला नागेश्वरबरोबर लढण्यासाठी बळ देणार आहेत. वर्षा उसगावकर यांच्या एन्ट्रीबद्दल आलेल्या प्रोमोमध्ये त्या म्हणजेच त्यांच्यातली 'माई' गिरिजाला म्हणते, "तुझी रक्षणकर्ती तूच आहेस पोरी.... तुझ्या मनगटातील बळ तू सर्वांना दाखव. कर दोन हात।" या प्रोमोमुळे आता प्रेक्षकांना त्यांना पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.






