धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास


सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला आहे. बॉक्स ऑफिसवर धुरंधरची तुफान चर्चा सुरू असतानाच हॉलीवूडच्या एका बिग बजेट फिल्मने सगळ्यांनाच विचारात टाकलंय. कोणताही गाजावाजा न करता हॉलिवूडचा 'Avatar Fire And Ash' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने ओपनिंगलाच ५०० कोटी कमावले आहेत. भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या तुफानदार कमाईमुळे बॉलिवूडचे अनेक प्रोजेक्टसही सावध झाले आहेत.


धुरंदरच्या काळातही या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी ठरवले आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सर्व चित्रपटाना मागे टाकले आहे. आणि चांगली कमाई देखील केली आहे. विषेश म्हणजे २०२५ च्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होऊन हॉलीवूड चित्रपटांमध्ये अवतार ३ने पहिला नंबर पटकावलाय.


दिवसागणिक कमाई (नेट):


पहिला दिवस - १९ कोटी


दुसरा दिवस - २२.५ कोटी


तिसरा दिवस - २५.७५ कोटी


चौथा दिवस - ९ कोटी


पाचवा दिवस - ९.३ कोटी


सहावा दिवस - १०.६५ कोटी


सातवा दिवस - १३.३ कोटी


एकूण - १०९.४५ कोटी


भारतामधील २०२५ चे टॉप ५ हॉलीवूड ग्रॉसर्स (नेट):


अवतार: फायर अँड ॲश - १०९.४५ कोटी (७ दिवसांत)


मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंग -१०६.०९ कोटी


एफ१ - १०२.८२ कोटी


ज्युरासिक वर्ल्ड: रीबर्थ - १००.५६ कोटी


द कॉन्ज्युरिंग: लास्ट राइट्स - ८२.११ कोटी


पहिल्या ‘अवतार’ला मागे टाकणार का?


पहिल्या अवतारने भारतात सुमारे १४१. २५ कोटी नेट कमावले होते.सध्या 'Avatar: Fire And Ash' हा अवतार फ्रँचायझीमधील सर्वात कमी कमाई करणारा भाग आहे. मात्र आतापर्यंत १०९. ४५ कोटींची कमाई झाल्याने आणि ख्रिसमस-नववर्षाच्या सुट्टीचा फायदा मिळाल्याने हा टप्पा पार करण्याच्या दिशेने चित्रपट वेगाने वाटचाल करत आहे. पण, Avatar: The Way Of Water ची ३९०.६ कोटींची विक्रमी कमाई गाठणं मात्र सध्या अशक्यच वाटत आहे.

Comments
Add Comment

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.