नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात ६ पटीने, तर निर्यातीत ८ पटीने वाढ झाल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या नव्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे. आर्थिक वर्ष १४-१५ मध्ये इलेक्ट्रिक उत्पादन १.९ लाख कोटी होत ते २०२४-२५ पर्यंत ११.३ लाख कोटी झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच निर्यातीत याच १० वर्षाच्या कालावधीत ०.३८ लाख कोटीवरून ३.३ लाख कोटीवर वाढ झाल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत या वाढीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन व केंद्र सरकारच्या पीएलआय (Production Linked Incentive PLI Scheme) योजनेचेही योगदान असल्याचेही ते म्हणाले आहेत. प्रामुख्याने या योजनेसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे उत्पादनही १.९ लाख कोटीवरून या १० वर्षात ११.३ लाख कोटींवर वाढल्याचेही ते म्हणाले आहेत.
1/11) India’s growth story in electronics manufacturing is PM @narendramodi Ji's vision of developing a comprehensive ecosystem. pic.twitter.com/2fHfqqXewi
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 27, 2025
मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी (Large Scale Electronic Manufacturing LESM) १३४७५ कोटीची गुंतवणूक देशात झाली असून ९.८ लाख कोटीचे उत्पादन साध्य करण्यात भारत यशस्वी झाल्याचेही आकडेवारी दिसून आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर कृतज्ञता व्यक्त करताना,' भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील वाढीचे श्रेय पंतप्रधान मोदींच्या सर्वसमावेशक परिसंस्था विकसित करण्याच्या दूरदृष्टीला जाते. गेल्या दशकात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात २५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. हीच तळागाळातील खरी आर्थिक वाढ आहे. जसजसे आपण सेमीकंडक्टर आणि घटक उत्पादनाचा विस्तार करू, तसतशी रोजगार निर्मितीला गती मिळेल' असे एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
'मोबाइल फोनचे उत्पादन ०.१८ लाख कोटींवरून ५.५ लाख कोटींपर्यंत वाढले तर त्याची निर्यात नगण्य ०.०१ लाख कोटींवरून २ लाख कोटींपर्यंत वाढली, जे 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे प्रतिबिंब आहे. सरकारचा सुरुवातीचा भर तयार उत्पादनांवर होता.आता आम्ही मॉड्यूल्स, घटक, सब-मॉड्यूल्स, कच्चा माल आणि ते बनवणारी यंत्रे यासाठी क्षमता निर्माण करत आहोत' असेही वैष्णव यांनी त्यांच्या एका 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय वाढलेल्या मोबाइल उत्पादनावर भाष्य करताना,'मोबाइल फोनचे उत्पादन ०.१८ लाख कोटींवरून ५.५ लाख कोटींपर्यंत वाढले, तर त्याची निर्यात नगण्य ०.०१ लाख कोटींवरून २ लाख कोटींपर्यंत वाढली, जे 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे प्रतिबिंब आहे. सरकारचा सुरुवातीचा भर तयार उत्पादनांवर होता. आता आम्ही मॉड्यूल्स, घटक, सब-मॉड्यूल्स, कच्चा माल आणि ते बनवणारी यंत्रे यासाठी क्षमता निर्माण करत आहोत' असे त्यांनी यापूर्व 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले होते.
पीएलआय योजनेबाबतीत आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार, एकूण २४९ अर्जांमध्ये १.१५ लाख कोटींची गुंतवणूक, १०.३४ लाख कोटींचे उत्पादन आणि १.४२ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. या वाढलेल्या गुंतवणूकीबाबत त्यांनी ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणुकीची वचनबद्धता असल्याचे नमूद केले त्यांच्या 'एक्स' पोस्टमध्ये त्यांनी आतापर्यंत मंजूर झालेल्या दहा सेमीकंडक्टर युनिट्सचाही उल्लेख केला. यापैकी तीन युनिट्स आधीच प्रायोगिक किंवा सुरुवातीच्या उत्पादनाच्या टप्प्यात आहेत. भारतातील फॅब्स आणि एटीएमपी लवकरच फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना चिप्स पुरवतील अशी माहिती त्यांनी 'एक्स' पोस्टमध्ये दिली आहे. त्यांच्या मते, तयार उत्पादनांपासून ते घटकांपर्यंत, भारतातील उत्पादन वाढत आहे आणि निर्यातही वाढत आहे. जागतिक कंपन्या आत्मविश्वासाने गुंतवणूक करत आहेत. भारतीय कंपन्या स्पर्धात्मक आहेत. नोकऱ्या निर्माण होत आहेत.हीच 'मेक इन इंडिया'च्या प्रभावाची कहाणी आहे! असे मंत्री वैष्णव यांनी आपल्या निवेदनात अंतिमतः म्हटले आहे.






