कराची: पाकिस्तानमधील ढासळलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या दोन वर्षांत हजारो डॉक्टर, इंजिनिअर्स आणि अकाउंटंट्सनी देश सोडला आहे. पाकिस्तान सरकारच्या एका अहवालातून याची भीषणता समोर आली आहे. या अहवालानुसार, गेल्या २४ महिन्यांत पाकिस्तानातून ५ हजार डॉक्टर, ११ हजार इंजिनिअर्स आणि १३ हजार अकाउंटंट्स परदेशात निघून गेले आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिक सरकार वर कडाडून टीका करत आहेत.
पाकिस्तानचे माजी सिनेटर मुस्तफा नवाज खोखर यांनी सरकारचा हा अहवाल समोर आणला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यातील आकडेवारी पोस्ट करत, "अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर आधी राजकारण सुधारा!" असे सरकारला बजावले आहे. तर या प्रकरणात विशेषतः पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची टिंगल उडवली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांनी लोकांच्या देश सोडून निघून जाण्याला 'ब्रेन गेन' असे म्हणत, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला सकारात्मक ठरवण्याचा प्रयत्न केला होता.
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित ...
पाकिस्तान ब्युरो ऑफ एमिग्रेशन अँड ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटने नुकतेच जारी केलेल्या आकडेवारीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२४ मध्ये ७ लाख २७ हजार ३८१ पाकिस्तानी नागरिकांनी परदेशात रोजगारासाठी नोंदणी केली होती. तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६ लाख ८७ हजार २४६ लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, आता फक्त कामगारच नाही, तर उच्चशिक्षितही मोठ्या संख्येने कामाच्या शोधात देश सोडून जात आहेत.
पाकिस्तानातील रुग्णसेवेलाही याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २०११ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानातून नर्सच्या स्थलांतरात भीषण वाढ झाली आहे. डॉक्टर आणि इंजिनिअर्स मोठ्या संख्येने देश सोडून जात असल्याबाबत आकडेवारी समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर सरकारची टिंगल उडवत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या ऑगस्ट महिन्यातील एका विधानाचा दाखला देत त्यांची खिल्ली उडवली आहे. अमेरिकेत देशाबाहेर राहणाऱ्या लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात मुनीर यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतराला 'ब्रेन ड्रेन' मानण्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांनी याला 'ब्रेन गेन' असे म्हटले होते. मात्र त्यांच्या या विधानामुळे मुनीर हे इंटरनेटवर थट्टेचा विषय बनले आहेत.






