Saturday, December 27, 2025

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं बाळ कसही असलं तरी ते बाकी सगळ्यांपेक्षा आईला अधिकच प्रिय असत. आणि त्यात आई आणि मुलीच नातं हे खूप वेगळं असत, कोणाहीपेक्षा लेक आईचं मन समजून घेऊ शकते असं म्हणतात. मात्र पनवेलमधील कळंबोलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे या नात्याला काळीमा फासला गेला आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या लेकीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

कळंबोलीतील सेक्टर १ मधील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीत आयटी इंजिनिअर तरुण आपल्या बीएससी शिक्षण घेतलेल्या ३० वर्षांच्या पत्नीसोबत राहतो. या महिलेला मुलगी नको होती. विशेष म्हणजे त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडचण जाणवत होती. ती मराठीऐवजी हिंदी भाषेचे शब्द जास्त वापरायची. तिच्या बोलण्यात अधिकांश हिंदी भाषा असायची. मुलीच्या आईला हे आवडत नव्हतं. मुलीच्या आरोग्याच्या अडचणीमुळे तिची आई मानसिक तणावात होती. अनेकदा तिने पतीला अशी मुलगी नको असल्याचं म्हटलं होतं. पती तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

हृदयविकाऱ्याचे झटक्याने मृत्यूचा बनाव...

२३ डिसेंबरच्या रात्री महिलेने मुलीची हत्या केली आणि तिला बेडवरच झोपवलं. पती घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांना या सर्व प्रकारावर संशय आला. त्यांनी डॉक्टरांकडे शवविच्छेदनाची चौकशी केली. शेवटी अहवालात मुलीच्या श्वसनमार्गात अडथळा आल्याचं लक्षात आलं. शेवटी पोलिसी खाक्या दाखवित पती-पत्नीची चौकशी करण्यात आली. यानंतर आईनेच खून केल्याची कबुली दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा