RBI Bulletin: गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा ४.३६ अब्ज डॉलरने वाढला

आरबीआयच्या बुलेटिनमध्ये स्पष्ट


मोहित सोमण: आरबीआयने (Reserve Bank of India) १९ डिसेंबर आठवड्याच्या बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात परकीय चलन साठ्यात (Foreign Exchange Reserves Forex) ४.३६ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने चलनसाठा ६९३ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. माहितीनुसार, एफसीए (Foreign Currency Assets FCA) या संपूर्ण आठवड्यात १६४ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने ते ५५९ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. याशिवाय एसडीआर (Special Drawing Rights SDR) मध्ये आठवड्यात ८ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने १८.७४ अब्ज डॉलरवर पोहोचले. आरबीआयच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे की सोन्याचा साठा (Gold Reserves) आठवड्यात २.६२ अब्ज डॉलरने वाढत ११०.३६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.


संपूर्ण आठवड्यात रुपयामध्ये मोठी अस्थिरता (Volatility) दिसून आली आणि सलग चार सत्रांमध्ये डॉलरच्या तुलनेत नवीन निचांकि आकडा गाठला होता. जागतिक स्तरावर फेडदर व्याजदर कपातीनंतर कमोडिटी व डॉलर निर्देशांकाय मजबूती आल्याने रूपया कमकुवत झाला होता. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली. परिणामी रूपयांचे मागणी घटल्याने आणखी अवमूल्यन झाले होते. या अस्थिर सत्रातील व्यापारादरम्यान, प्रति डॉलर ९१.०८ आणि ८९.२५ च्या दरम्यान चढउतार झाल्याने, अखेरीस रूपया डॉलरच्या तुलनेत सुमारे १.३% मजबूत झाला होता.


बाजारातील मोठ्या सट्टेबाजीच्या स्थितीची व्याप्ती लक्षात घेतल्यानंतर आरबीआयने अधिक आक्रमकपणे हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल ज्यामुळे स्पॉट दर खाली आला. १९ डिसेंबर रोजी शेवटच्या तासाभरात रुपयामध्ये तीव्र वाढ झाली जी कदाचित आरबीआयने केलेल्या आक्रमक डॉलर विक्रीमुळे झाली असल्याचा तज्ञांचा कयास होता. या दिवशी मध्यवर्ती बँकेने सुमारे ३ अब्ज ते ४ अब्ज डॉलर्सची विक्री केली असावी असा अंदाज आहे.


दरम्यान,आरबीआयने डिसेंबर महिन्यात आतापर्यंत खुल्या बाजारातील केलेली २ लाख कोटींची खरेदी (OMO) आणि फॉरेक्स खरेदी-विक्री स्वॅपद्वारे १.४५ ट्रिलियन रुपयांची दीर्घकालीन तरलता बाजारात आणली आहे. त्यामुळे रूपया काही प्रमाणात स्थिरावला आहे.याशिवाय भारताची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताची राखीव स्थिती ९५ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.७८ अब्ज डॉलर्स झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये भारताचा परकीय चलन साठा ७०५ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.

Comments
Add Comment

२०२६ मध्ये रिलायन्स विरूदध सरकार २४७ दशलक्ष डॉलरचा KG D6 Oil वाद निवळणार

मोहित सोमण: आर्थिक वर्ष २००० पासून रिलायन्स के जी डी ६ (KG D6 Oil) ब्लॉकचे अधिकृत ऑपरेटर आहेत. कच्च्या तेलाच्या रिफायनरी

योगी आदित्यनाथ, नितेश राणेंसह हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांना मोठी मागणी

मुंबईसह २९ महापालिकांमध्ये तोफा धडाडणार; विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देणार मुंबई : राज्यातील २९

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन डी. सी. : ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत कार्यरत विमान कंपन्यांची १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

EPFO 3.0: ईपीएफओ परिवर्तनाला 'मान्यता' पैसै काढण्यापासून पीएफ खात्यात आमूलाग्र बदल जाहीर

मुंबई: केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (Central Board of