Saturday, December 27, 2025

Gold Silver Rate: सोन्याचांदीत सलग पाचव्यांदा तेजीचा 'महापूर' सोने १४१००० तर चांदी २५१००० पार

Gold Silver Rate: सोन्याचांदीत सलग पाचव्यांदा तेजीचा 'महापूर' सोने १४१००० तर चांदी २५१००० पार

मोहित सोमण: भूराजकीय अस्थिरता, घसरलेला रूपया, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढलेली अतिरिक्त गुंतवणूक ज्यामुळे रूपयांचे अवमुल्यन (Devaluation), व जागतिक दर्जावरील सोन्याचांदीची दरवाढ या एकत्रित कारणांमुळे सोने व चांदी भारतीय बाजारात प्रचंड प्रमाणात उसळल्या आहेत. सलग पाचव्या सत्रात सोने चांदी तुफान पातळीवर वाढल्याने आणखी एक उच्चांकावर पोहोचले आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावर माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ११० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९० रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४१२२ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२९४५ रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०५९२ रूपयांवर पोहोचले आहेत.

तर माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२००, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११०० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ९०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४१२२०, २२ कॅरेटसाठी १२९४५०, १८ कॅरेटसाठी १०५९२० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४१२२ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२९४५ रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०८५० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात आज ०.०५% वाढ झाल्याने दरपातळी १३९९४० रूपयांवर पोहोचली.

चांदीच्या दरात तर सर्वोच्च पातळीवर विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या बाबतीत आज भारतीय सराफा बाजारातील चांदीच्या किंमतीत एका सत्रात ७% वाढ झाली आहे. उपलब्ध संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ११ रूपयांनी, प्रति किलो दरात तब्बल ११००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति ग्रॅम दर २५१ व प्रति किलो दर २५१००० गेले आहेत. ज्यामुळे आज चांदी आज २५०००० रुपयांहून वाढल्याने एका सत्रात ७% पेक्षा अधिक पातळीवर महागली आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा आणखी एकदा फटका चांदीच्या बाबतीत अधिक जाणवला.

युएस व व्हेनेझुएला यांच्यातील वाद, तसेच युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अनास्था व डॉलरवरील घसरलेला दबाव या कारणामुळे चांदीला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.प्रामुख्याने औद्योगिक मागणीसह वैयक्तिक गुंतवणूक म्हणून चांदीची मागणी वाढत असताना चांदीच्या पुरवठ्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ही रॅली आजही कायम राहिली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर २५१० रूपये, प्रति किलो २५१००० रूपयांवर पोहोचले आहेत. २२ डिसेंबरपासून पाच दिवसांत चांदीच्या प्रति किलो किंमतीत ३५००० रूपयांनी वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात आज ७.५६% वाढ झाली असून दरपातळी २४०९३५ रूपयांवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment