Saturday, December 27, 2025

FIIs Stock Market Outflow: २०२५ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २ लाख कोटींची बाजारातून विक्री

FIIs Stock Market Outflow: २०२५ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २ लाख कोटींची बाजारातून विक्री

मोहित सोमण: एनएसडीएल (National Security Depository Limited NSDL) ताज्या प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FIIs) यांनी संपूर्ण वर्षभरात २ लाख कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातून काढून टाकली असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढल्याचे स्पष्ट झाले असताना रूपयांचे अवमुल्यन झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार सर्वाधिक रक्कमेची जावक (Outflow) आयटी क्षेत्रातून झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तब्बल ७९१५५ कोटी रुपयांची ही जावक असून उर्वरित महत्वाच्या क्षेत्रात हेल्थकेअर (२४३२४ कोटी), कंज्यूमर ड्युरेबल्स (२१५६७ कोटी), कंज्यूमर सर्विसेस (१९९१४ कोटी), रियल्टी (१२३६४ कोटी), फायनांशियल सर्विसेस (१०८९४ कोटी), ऑटोमोबाईल (९२४२ कोटी) क्षेत्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूकदारांनी जावक केल्याचेही यात स्पष्ट झाले आहे. दरम्यान आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑईल अँड गॅस (९०७६ कोटी), सर्व्हिस (८११२ कोटी), टेलिकॉम (४७१०९ कोटी) रुपयांची गुंतवणूक निव्वळ आवक (Net Inflow) झालेली आहे.

यापूर्वी शेअर बाजारातील झालेली आकर्षक आवक यंदा मात्र मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्रामुख्याने इतर चीन, जपान, युरोप, युएस अशा शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भारतापेक्षा अधिक १२ ते ६१% परतावा (Returns) मिळाला असल्याने गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक फटका आयटीत बसला आहे. जगभरातील भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील झालेले स्लोडाऊन व कर्मचारी कपात, आर्थिक अस्थिरता अशा कारणांमुळे या क्षेत्रातील गुंतवणूकीला फटका बसला. दरम्यान आकडेवारीत स्पष्ट केल्याप्रमाणे झालेली जावक शोषून घेण्यासाठी घरगुती गुंतवणूकदारांनी एसआयपीत (Systematic Investment Plan SIP) केलेल्या विक्रमी वाढीमुळे बाजारात त्याचा तुलनात्मकदृष्ट्या फायदा झाला आहे. तब्बल ही गुंतवणूक ३.२ लाख कोटीवर गेल्याने यांचा सर्वाधिक गुंतवणूक फायदा लार्जकॅप व नवीन सूचीबद्ध झालेल्या कंपनीत झाल्याचे स्पष्ट झाले.

एकंदरीतच आर्थिक वर्ष २०२५ मधील मोठ्या प्रमाणावरील शेअर्समध्ये झालेली विक्री जागतिक बदलांचे आणि देशांतर्गत मूल्यांकनावरील दबावांचे प्रतिबिंब असले तरी नफ्याच्या वाढीची सुधारलेली शक्यता, सरकारी धोरणात्मक पाठिंबा आणि मजबूत देशांतर्गत गुंतवणुकीत झालेली वाढ अथवा आवक यामुळे गुंतवणूकदार आशावादी आहेत. तज्ञांच्या मते हा सर्वात वाईट काळ कदाचित संपला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये गुंतवणुकीच्या प्रवाहात हळूहळू स्थिरीकरण किंवा उलटफेर होण्याची शक्यता आहे तथापि जागतिक अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदारांनी निवडक राहावे आणि मूलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करावे असे तज्ज्ञ सांगतात.एफआयआय निव्वळ विक्रेते असतानाही, या देशांतर्गत लवचिकतेने व्यापक बाजारातील घसरणीला आधार दिला आहे.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला २०२६ मध्ये काय?

ॲक्सिस सिक्युरिटीजने एक सकारात्मक दृष्टिकोन या आऊटलूक विषयी मांडला आहे. ज्यानुसार आर्थिक २०२६ मध्ये मूल्यांकनावर आधारित स्थिरीकरणाकडून नफ्यावर आधारित तेजीच्या चक्राकडे (Bull Cycle) बदल अपेक्षित आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून 'घसरण झाल्यावर खरेदी करा' (बाय ऑन डिप्स) या दृष्टिकोनाची ब्रोकरेज शिफारस करते. आरोग्यसेवा, वित्तीय सेवा यासह विविध मार्केट कॅपमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पीएसयु बँक शेअर्समध्ये पुनरागमची शक्यता वर्तवली असून हे शेअर रिबाऊंड होऊन चांगला परतावा (Returns) देतील असा अंदाज गुंतवणूकदारांसाठी बांधला आहे.

Comments
Add Comment