मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८ डिसेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकीकडे ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार असले, तरी दुसरीकडे ३१ डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने १२ विशेष लोकल चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या लग्नाची 'बॅचलर पार्टी' साजरी करण्यासाठी ...
रविवार, २८ डिसेंबरचा मेगाब्लॉक तपशील
१. मध्य रेल्वे (माटुंगा ते मुलुंड)
- वेळ: सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत.
- मार्ग: अप आणि डाऊन जलद मार्ग.
- परिणाम: ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
२. हार्बर रेल्वे (सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे)
- वेळ: सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत.
- मार्ग: अप आणि डाऊन दोन्ही मार्ग.
- परिणाम: सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
- पर्यायी सोय: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉक काळात कुर्ला स्थानकातून पनवेलसाठी विशेष लोकल चालवल्या जातील.
३१ डिसेंबरसाठी विशेष भेट: रात्री धावणार जादा लोकल
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन बुधवारी (३१ डिसेंबर) मध्यरात्री विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ४ विशेष फेऱ्या (सर्व रात्री १.३० वाजता)
- सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते सीएसएमटी.
- सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी.
पश्चिम रेल्वेच्या ८ विशेष फेऱ्या
चर्चगेट ते विरार : रात्री १.१५, २.००, २.३० आणि पहाटे ३.२५ वाजता.
विरार ते चर्चगेट : रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि मध्यरात्री ३.०५ वाजता. (या सर्व गाड्या धिम्या मार्गावर सर्व स्थानकांवर थांबतील.)






