उरण नगर परिषद नगराध्यक्ष निवडीत भाजपला धक्का

उरण निवडणूक चित्र


विशाल सावंत उरण : उरण नगर परिषद निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडीत भाजपची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. या नगर परिषदेवर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा शाह यांना पराभवाचा धक्का बसला.


या नगर परिषदेत एक हाती भाजपची सत्ता होती. मात्र यावेळच्या उरण नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडीत भाजपकडून ही नगरपालिका निसटली आहे. तेथे भाजपला २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे. उरण तालुक्यात भूमिपुत्रांचा रोष हा भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवार शोभा शाह यांना मतदारांनी साफ नाकारले आणि या अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत शोभा शाह यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले, असले, तरी या नगर परिषदेत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले. ही संख्या सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेशी असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे.


या निवडणुकीदरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार बाळ्या मामा असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, स्वतः या नेत्यांनी या निवडणुकीत थेट सहभाग घेतला होता. दुसरीकडे आमदार महेश बालदी यांनी पूर्णपणे जोर लावला असतानाही भाजपला आपले नगराध्यक्ष पद गमवावे लागले. खरे तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे होतेच; परंतु येथे जातीचे, प्रांतवादाचे मुद्देही निर्णायक ठरले, तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनाही भाजपने विचारात न घेता, भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरला होता. त्याचा परिणाम म्हणून बंडखोर उमेदवार यांनी भाजपची मते आपल्याकडे खेचल्याचे बोलले जाते. गेली १५ ते २० वर्षांची भाजपची सत्ता उलथून एक महिला षंडू ठोकून उभी राहिली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला.

Comments
Add Comment

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय - शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने