Saturday, December 27, 2025

२००० कोटीपेक्षा अधिक मोठा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेकडून उघड

२००० कोटीपेक्षा अधिक मोठा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेकडून उघड

मोहित सोमण: पंजाब नॅशनल बँकेने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये मोठा घोटाळा उघड केला आहे. दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांनी २००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा केल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी उशीरा एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत पीएनबी (Punjab National Bank) म्हटले आहे की, सेबीच्या कलम ३० एलओडीआर (LODR Act 2015) कायद्याच्या पूर्ततेनुसार बँकेने आरबीआयला संबंधित प्रवर्तकांनी केलेल्या घोटाळ्याची माहिती दिली आहे.' असे म्हटले आहे. एसईएफएल (SREI Equipment Finance SEFL) व एसआरईआय (SREI Infrastructure Finance Limited) या दोन कंपनीच्या प्रवर्तकांनी अनुक्रमे १२४०.९४ व ११९३.०६ कोटींच्या केलेल्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एनसीएलटीने यावर यापूर्वीच कार्यवाही सुरू केली होती. बँकेने त्याची माहिती आरबीआयच्या पूर्ततेसाठी दिली असल्याचे एक्सचेंजला कळवले आहे.

दोन्ही कंपन्यांनी २०२१ वर्षाच्या सुमारास संबंधित रक्कमेचे कर्ज काढले होते. परंतु दोन्ही प्रवर्तकांनी ही १००% रक्कम अद्याप भरली नसल्याचे बँकेने म्हटले. यानंतर एसआरईआय (SREI Infrastructure Finance Limited) कंपनीच्या दिवाळखोरीनंतर एनसीएलटीने (National Company Law Tribunal NCLT) दिवाळखोरी प्रस्तावावर काही यशस्वी ठराव मांडला होता. त्यानंतर कंपनीच्या पुनर्वसनासाठी एनएआरसीएल (National Asset Reconstruction Co NARCAL) कंपनीने आपल्या दिलेल्या माहितीनुसार, या यशस्वी प्रस्तावानुसार जुने संचालक मंडळ बरखास्त करून नवे संचालक मंडळ बनवले गेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये आरबीआयने प्रवर्तकांविरोधात दिवाळखोरीची प्रकिया सुरू केली होती. त्यानंतर २८००० कोटींच्या प्रलंबित थकबाकीवर कार्यवाही करण्यापूर्वी आरबीआयने दोन्ही कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. दुसऱ्या तिमाही दरम्यान बँकेचे एनपीए (Non Performing Assets NPA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४७५८२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४०३४३ कोटींवर घसरले होते. असे असले तरी बँकेने ६४८ कोटींची राखीव तरतूद (Provision) नफापूर्व पातळीवर केली होती. दरम्यान पहिल्या तिमाहीत बँकेने ३९०९ कोटींची वसूली केली होती.

पीएनबी भारतातील पहिल्या तीन सरकारी पीएसयु बँकापैकी एक बँक ओळखली जाते. सध्या बँकेच्या १०२२८ पेक्षा अधिक स्थानिक शाखा व २ आंतरराष्ट्रीय शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या मुख्य शाखांची अधिक संख्या ग्रामीण व निमशहरी भागात तब्बल ६३.३% आहे. काल बँकेच्या शेअर्समध्ये ०.५% घसरण झाली असून बँकेचा शेअर १२०.३५ रुपये प्रति शेअरवर बंद झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा