मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५० मतदार प्रत्यक्षात दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त यादीनुसार सुरुवातीला ११ लाख एक हजार ५०७ दुबार मतदारांची नोंद होती; मात्र मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत केलेल्या सखोल तपासणीतून दुबार मतदारांची नावे पडताळली.


दुबार मतदारांची मोठी आकडेवारी पारंपरिक (मॅन्युअल) पद्धतीने तपासली असती, तर किमान तीन ते चार महिने लागले असते; मात्र महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तसेच एफ उत्तर व एन विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या प्रायोगिक उपाययोजनांमुळे दुबार मतदार शोधण्याचे ‘डेस्क वर्क’ अवघ्या तीन ते चार तासांत पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले इलेक्शन डाटा एक्सट्रक्शन सॉफ्टवेअर वापरण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने एक्सल फॉर्म्यूला वापरून एकाच वॉर्डमध्ये दोन किंवा अधिक वेळा नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी, तसेच एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली.


प्राथमिक छाननीनुसार, एकाच वॉर्डमधील दुबार नावे दोन लाख २५ हजार ५७२, तर एकापेक्षा अधिक वॉर्डमधील नावे आठ लाख ७५ हजार ९३५ इतकी होती. यानंतर प्रत्येक वॉर्डनिहाय सखोल पडताळणी करण्यात आली. या तपासणीनंतर दुबार मतदार निश्चित करण्यात आले असून, त्यांच्याबाबत गृहभेटी घेऊन प्रत्यक्ष पडताळणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिकेने राबवलेल्या या तंत्रज्ञानाधारित मॉडेलचे राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.


महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट १,२६,६१६ घरांना भेट देऊन पडताळणी केली. यापैकी ४८,३२८ मतदारांनी फॉर्म ‘अ’ सादर केला. या फॉर्ममध्ये, दुबार मतदारांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शविली. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या यादीत फक्त १५ टक्के दुबार मतदार आढळल्याचे पालिकेने नोंदवले आहे. एकूण दुबार मतदारांच्या १०० टक्के पडताळणी करण्यात आली आहे. एल वॉर्ड, के पश्चिम वॉर्ड आणि आर सेंट्रल वॉर्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले. मुंबईतील एका वॉर्डमध्ये तीन ते चार वेळा दुबार मतदारांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यामुळे जे दुबार मतदार नाहीत, त्यांच्या नावांपुढील डबल स्टार काढून टाकले जातील. जे प्रत्यक्षात दुबार मतदार आहेत, त्यांच्या नावापुढील डबल स्टार कायम ठेवले जाणार आहेत. मतदान करताना त्यांच्याकडून एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याचे हमीपत्र लिहून घेतले जाईल.

Comments
Add Comment

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे

निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात

परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५

भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर

राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’

मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान