कामत लेगसी’ वर्षाचा शेवट खास चवदार अनुभवाने करण्यासाठी ‘द ग्रेट साउथ इंडियन बिर्याणी फेस्टिव्हल’ सादर करत आहे. हा मर्यादित कालावधीचा खाद्य महोत्सव दक्षिण भारतातील सर्वांत प्रसिद्ध शाकाहारी बिर्याणी एकाच छताखाली आणतो. हा फेस्टिव्हल २४ डिसेंबरपासून सुरू झाला असून ४ जानेवारी २०२६ पर्यंत वाशी, मालाड, नरिमन पॉइंट आणि मीरा रोड येथील सर्व ‘कामत लेगसी’ आउटलेट्समध्ये साजरा होणार आहे.
परंपरेवर आधारित आणि काळजीपूर्वक तयार करण्यात आलेला हा महोत्सव ‘कामत लेगसी’च्या शुद्ध शाकाहारी, अस्सल आणि घरगुती चवीच्या स्वयंपाकाच्या तत्त्वज्ञानाशी पूर्णतः सुसंगत आहे. मेन्यूतील प्रत्येक पदार्थ ‘अम्मा-स्टाइल’ म्हणजेच संथ शिजवलेला, संतुलित मसाल्यांचा आणि घरगुती चवीची अनुभूती देणारा (दक्षिण भारतीय घरांतील जेवणाची आठवण करून देणारा) आहे. या महोत्सवात पाहुण्यांना दक्षिण भारतातील पाच खास शाकाहारी बिर्याणींचा आस्वाद घेता येणार आहे. प्रत्येक बिर्याणी एका वेगळ्या प्रादेशिक परंपरेचे प्रतिनिधित्व करते. मेन्यूमध्ये सौम्य मसाले आणि मऊ काथल (फणस) असलेली अंबूर काथल व्हेज बिर्याणी, कर्नाटकच्या पारंपरिक पद्धतीने दिली जाणारी दमदार चवीची डोणे व्हेज बिर्याणी, केरळच्या मलबार किनाऱ्यापासून प्रेरित थालास्सेरी सोया बिर्याणी, सुगंधी आणि हलक्या मसाल्यांची नारळाच्या दुधातील व्हेज राइस, सुगंधी बासमती भात आणि पनीरच्या थरांनी सजलेली सर्वांची आवडती हैदराबादी पनीर बिर्याणी यांचा समावेश आहे.
या महोत्सवाबद्दल बोलताना ‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम कामत म्हणाले, की ‘बिर्याणी म्हटले की बहुतेकदा भरीव जेवणाचा विचार केला जातो; मात्र दक्षिण भारतात शाकाहारी बिर्याणीला नेहमीत विशेष स्थान मिळाले आहे. हा त्या परंपरेचा उत्सव आहे. मेन्यूतील प्रत्येक बिर्याणी तिच्या अस्सलतेसाठी निवडली असून, ती जशी पारंपरिक घरगुती स्वयंपाकघरात बनते, तशीच तयार केली जाणार आहे. हे आरामदायी आणि प्रामाणिक अन्न आहे; विशेषतः सणासुदीच्या काळात लोकांना एकत्र आणणारे. अंबूरपासून थालास्सेरीपर्यंत प्रत्येक प्रदेशाची खाद्यकथा वेगळी आहे. त्या सर्व कथा एकाच टेबलावर आणून दक्षिण भारतीय शाकाहारी बिर्याणी किती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत हे पाहुण्यांना अनुभवता यावे, हाच आमचा उद्देश आहे.’