Friday, December 26, 2025

हिवाळी बचतीचे 'भांडार' बीकेसीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

हिवाळी बचतीचे 'भांडार' बीकेसीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

विजय सेल्‍सच्या आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पोमध्ये १०० हून अधिक टॉप ब्रँड्सची उत्पादने उपलब्ध

मुंबई: धमाकेदार डील्ससाठी विजय सेल्सने बीकेसीत भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पुढे आले आहे. भारतातील मुख्य प्रवाहातील ओम्नी चॅनेल इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल साखळी असलेल्या विजय सेल्सने 'आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पो'सह (IICF Consumer Expo) सह कार्यक्रमाची सुरुवात केली होती. विजय सेल्‍स २३ डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत बीकेसीमधील एमएमआरडीए ग्राऊंड येथे मुंबईतील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाचे आयोजन केले होते ५ जानेवारी ही प्रदर्शनाची अंतिम तारीख असणार आहे. विशाल ६०००० चौरस फूट जागेवर आयोजित करण्‍यात येणाऱ्या या १४ दिवसीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स शॉपिंग फेस्टिवलमध्‍ये विविध श्रेणींमधील १०० हून अधिक टॉप ब्रँड्स पाहायला मिळत आहेत. हिवाळी सुट्टीतील हंगामात ग्राहक एकाच छताखाली इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतील असे कंपनीने स्पष्ट केले होते.

उपलब्ध माहितीनुसार, या प्रदर्शनात नवी उत्पादने लाँच देखील होत आहेत. लाँचेससह प्रत्यक्ष लाइव्‍ह प्रात्‍यक्षिके व मोठ्या ब्रँडपैकी अँप्‍पल, सॅमसंग, एलजी, सोनी, वनप्‍लस, बोट, हायर, व्‍हर्लपूल, असुस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉर्फी रिकार्डस, फिलिप्‍स, वंडरशेफ, एओ स्मित अशा विश्वसनीय जागतिक व देशांतर्गत टेक प्रमुखांच्‍या विशेष ऑफर्स ग्राहक पाहू शकतात. नवीन स्‍मार्टफोन्‍स व एआय गॅझेट्सपासून प्रीमियम होम अप्‍लायन्‍सेस व स्‍मार्ट किचन सोल्‍यूशन्‍सपर्यंत प्रत्‍येक डिवाईस सर्वांचे लक्ष वेधून घेईल असा विश्वास कंपनीने यावेळी व्यक्त केला. प्रत्‍येक उत्पादन पोर्टफोलिओचे स्‍वत:चे समर्पित एक्‍स्‍पीरिअन्‍स झोन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ग्राहकांना खरेदीपूर्वी प्रत्‍यक्ष अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्‍याची संधी देते.

या प्रदर्शनाबाबत मत व्‍यक्‍त करत विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता म्‍हणाले, 'हे प्रदर्शन नाविन्‍यतेचे साजरीकरण, अनेक शक्‍यतांचे सादरीकरण आणि बहुमूल्‍य ग्राहकांकरिता नवीन गॅझेट्सचा शोध घेण्‍यासाठी संधी आहे. आम्‍ही त्‍यांना सर्वोत्तम टेक बँड्सचे नवीन लाँचेस आणि विविध ऑफरिंग्‍जचा अनुभव व आनंद देण्‍यासाठी हा इव्‍हेण्‍ट डिझाइन केला आहे. २०२५ चा निरोप घेत असताना विजय सेल्‍समध्‍ये आम्‍ही सर्वांना या टेक महोत्‍सवामध्‍ये सामील होण्‍याचे आणि प्रत्‍यक्ष भावी इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अनुभव घेण्‍याचे आवाहन करतो.'

कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहक त्‍यांच्‍या खरेदीवर विशेष त्‍वरित बँक सूट व कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात ज्‍यामधून त्‍यांना यंदा सणासुदीच्‍या काळादरम्‍यान त्‍यांच्‍या पैशांचे उत्तम मूल्‍य मिळेल. कंपनीने याविषयी अधिक माहिती देताना म्हटले आहे की, 'मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम (My Vijay Sales Loyalts Program) ग्राहकांना बचत वाढवण्‍यास मदत करतो जेथे स्‍टोअर्समध्‍ये शॉपिंगवर ०.७५ टक्‍के लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. मिळालेला प्रत्‍येक पॉइण्‍ट रिडम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपयाएवढा आहे.'

काय फायदे मिळत आहेत?

पात्र असलेल्या खरेदीधारकांना इक्सिगोकडून १००० रूपयांचे फ्लाइट व १००० रूपयांचे हॉटेल वाऊचर मिळेल. तसेच या अभ्‍यागतांना २५० रूपयांचे मायव्‍हीएस रिवॉर्ड्स लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स मिळत आहेत ज्‍यासाठी त्‍यांना प्रदर्शनामध्‍ये दाखवण्‍यात आलेला क्‍यूआर कोड स्‍कॅन करावा लागेल.

पेपर फायनान्‍स पर्यायांचा वापर करत व्‍यवहार करणाऱ्या अभ्‍यागतांना बजाज फिनसर्व्‍ह, आयडीएफसी बँक आणि एचडीबी फायनान्‍सकडून मोफत गिफ्ट्स मिळतील. तसेच ब्रँड ईएमआयच्‍या माध्‍यमातून किंवा पेटीएम पीओएसद्वारे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सचा वापर करत फुल स्‍वादइपच्‍या माध्‍यमातून २५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक किमतीपर्यंत खरेदी करणारे ग्राहक १००० रूपयांच्‍या पेटीएम फ्लाइट वाऊचर किंवा मूव्‍ही वाऊचरसाठी पात्र ठरतील.

टॉप बँकांकडून विद्यमान त्‍वरित सूट ऑफर्स

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डधारक ७५०० रूपये व त्‍यापेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ७५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. अमेरिकन एक्‍स्‍प्रेस क्रेडिट कार्डधारक २५००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर १५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात.

आयसीआयसीआय कार्डधारक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १५००० रूपये त्‍वरित सूटचा आणि २५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १२५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद ग्राहक घेऊ शकतात.

एचएसबीसी बॅाक कार्डधारक संपूर्ण आठवडा २०००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ७५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आणि शनिवारी व रविवारी २०००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक क्रेडिट व डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ६००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. आरबीएल बँक क्रेडिट कार्डधारक १५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ४००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात.

वनकार्ड क्रेडिट कार्डधारक १५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास २०००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. आयडीएफसी फर्स्‍ट बँक क्रेडिट कार्डधारकांना ५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १०००० रूपयांची म्‍हणजेच ५% त्‍वरित सूट मिळू शकते.

एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक क्रेडिट कार्डधारक १०००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १००० रूपयांची म्‍हणजेच ५% त्‍वरित सूटचा आणि फक्‍त रविवारी १००००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर ३००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा लाभ घेऊ शकतात.

येस बँक क्रेडिट कार्डधारकांना १०००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास २५०० रूपयांची ५% त्‍वरित सूट (Instant Discount) मिळू शकते.

बॉबकार्डधारकांना (Bank of Baroda) ७५०० रूपये व त्‍यापेक्षा अधिक बॉबकार्ड ईएमआयवर जवळपास ३००० रूपयांची म्‍हणजे १०% त्‍वरित सूट मिळू शकते.

पीएनबी बँक क्रेडिट कार्डधारकांना फक्‍त स्‍टोअर्स व प्रदर्शनामध्‍ये १५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ५००० रूपयांची म्‍हणजेच १०% त्‍वरित सूट मिळू शकते.

डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक ईमएआय व्‍यवहारांवर जवळपास ३००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आणि १५००० रूपये व त्‍यापेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा लाभ घेऊ शकतात असे विजय सेल्सने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Comments
Add Comment