Friday, December 26, 2025

E to E आयपीओ आजपासून बाजारात दाखल जबरदस्त मिळतोय प्रतिसाद पण हा सबस्क्राईब करावा का? जाणून घ्या

E to E आयपीओ आजपासून बाजारात दाखल जबरदस्त मिळतोय प्रतिसाद पण हा सबस्क्राईब करावा का? जाणून घ्या

मोहित सोमण: पहिल्या दिवशी ई टू ई कंपनी आयपीओला दुपारी १२.३० वाजेपर्यंत २.५२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण इशू सबस्क्रिप्शनपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून ३.२४ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २.८९ पटीने मिळाले असल्याने कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ई टू ई ट्रान्सपोर्टेशन (E to E Transportation) कंपनीचा एसएमई आयपीओ (SME IPO) आजपासून बाजारात दाखल झाला आहे. ८४.२२ कोटी मूल्यांकन असलेला हा आयपीओ आज २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बाजारातील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. हा संपूर्ण फ्रेश इशू असून ०.४८ कोटी शेअर्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. २ जानेवारीला एनएसई एसएमई (NSE SME) बाजारात सूचीबद्ध होणार असून पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) ३१ डिसेंबरला होणार आहे. कालच कंपनीने आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांकडून २३.९७ कोटींची निधी उभारणी केली होती. आयपीओसाठी कंपनीने प्राईज बँड (Price Band) १६४ ते १७४ रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २७८४०० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. म्हणजेच या गुंतवणूकदारांना १६०० शेअरचा गठ्ठा (Lot) खरेदी करणे अनिवार्य असेल. Hem Securities कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून MUFG Intime India Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Hem Finlease Private Limited कंपनी काम करणार आहे.

एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ५% वाटा मार्केट मेकरसाठी, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४७.४५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १४.२५%, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३३.२६%, अँकर गुंतवणूकदारांसाठी २८.४६% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. एकूण ४८४०००० शेअर आयपीओत फ्रेश इशूसाठी उपलब्ध असणार आहेत.

Zephyr Mantra LLC, Ventureast ETOE LLP, सुरजित मुखर्जी, विनय राव हे कंंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती पाहता कंपनीला आर्थिक २०२४-२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ३६% वाढ प्राप्त झाली होती. मार्च २०२५ मधील १३.९९ कोटी करोत्तर नफ्यातील तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये कंपनीला ७.४९ कोटीचा तोटा झाला होता. कंपनीच्या ईबीटातही तिमाही बेसिसवर (QoQ) २६.५७ कोटींच्या नफ्यातील तुलनेत ३.८८ कोटीचा तोटा झाला होता. कंपनीचा आयपीओपूर्व आरोई (Return on Equity RoE) १५.७२% आहे तर कंपनीच्या आरोसीई (Return on Capital Employed ROCE) १५.६९% होता. कंपनीचे पीएटी मार्जिन (PAT Margin) ५.७३% असून डेट टू इक्विटी गुणोत्तर ०.५७ रूपये आहे.

२०१० मध्ये स्थापन झालेली ई टू ई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी ही एक ISO प्रमाणित कंपनी आहे. कंपनी रेल्वे क्षेत्रासाठी सिस्टम इंटिग्रेशन आणि अभियांत्रिकी उपाय प्रदान करण्यासाठी सेवा पुरवते. उपलब्ध माहितीनुसार, सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T), ओव्हरहेड विद्युतीकरण (OHE), ट्रॅक प्रकल्प आणि सिस्टम इंटिग्रेशन, खाजगी साइडिंग आणि अभियांत्रिकी डिझाइन आणि संशोधन केंद्र (EDRC) या विभागात कंपनी कार्यरत असून ही कंपनी मेनलाइन, शहरी वाहतूक आणि खाजगी साइडिंग या विभागांमध्येही कार्यरत आहे. कंपनी रेल्वे अभियांत्रिकी उत्पादनासहित डिझाइन, खरेदी, व चाचणीसह संपूर्ण रेल्वे अभियांत्रिकी सेवा प्रदान करते. सिग्नलिंग आणि दूरसंचार प्रणाली, ट्रॅक विद्युतीकरण आणि नागरी व ट्रॅक घटकांचा समावेश असलेल्या टर्नकी रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, कंपनीने विभागीय रेल्वे, भारतीय रेल्वेच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी रेल्वे साइडिंग असलेल्या कॉर्पोरेट संस्था आणि भारत व निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पायाभूत सुविधा विकास कंपन्यांसाठी अनेक प्रकल्प राबवले आहेत. प्रमुख प्रकल्पांमध्ये हैदराबाद आणि नागपूर मेट्रोसाठी CBTC सिग्नलिंग, विझाग स्टील प्लांट आणि NUPPL पॉवर प्लांटसाठी सिग्नलिंग आणि दूरसंचार आधुनिकीकरण, होसूर-सेलमसाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम अपग्रेड, DFCC कनेक्टिव्हिटीसह गुजरात पिपावाव बंदरासाठी साइडिंग विस्तार आणि मुंबई मेट्रो लाइन ३ आणि चेन्नई मेट्रो फेज १ साठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरची स्थापना यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये अथवा पोर्टफोलिओत ४०११०.३७ लाख मूल्यांकनाचे ५० चालू करार समाविष्ट होते.

कंपनीला शेवटची जीएमपी १३० रूपये प्रति शेअर प्रिमियम दर्शविली जात आहे. १७४ रूपये मूळ प्राईज बँड असलेल्या तुलनेत १३० रूपये म्हणजेच हा शेअर तज्ञांच्या मते, ३०४ रूपये प्रति शेअर आसपास सूचीबद्ध (Listed) होणे अपेक्षित आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर दैनंदिन कामकाजासाठी, खेळत्या भांडवल गरजेसाठी (Working Capital Requirments) उभारण्यात येणार आहे.

गुंतवणूकदारांनी या आयपीओला सबस्क्राईब करावे का? तज्ञ काय म्हणतात?

बाजार व आयपीओतज्ज्ञ जेष्ठ पत्रकार दिलीप दावडा यांनी म्हटले आहे की,' ईटीआयएल ही रेल्वे अभियांत्रिकी समाधानांसाठी एक सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २४ आणि २५ साठी चांगली आर्थिक कामगिरी दर्शवताना, कंपनीने आर्थिक वर्ष २६ वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तोटा नोंदवला आहे, ज्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीकडे ४०१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर आहेत. तिच्या अलीकडील आर्थिक आकडेवारीनुसार, हा इश्यू आक्रमकपणे मूल्यांकित (Aggressively Priced) केलेला दिसत आहे. सुजाण गुंतवणूकदारच मध्यम मुदतीसाठी माफक निधी गुंतवू शकतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >