Friday, December 26, 2025

Stock Market Opening Bell: ख्रिसमोत्तर सत्रात बाजारात घसरण सेन्सेक्स १८३.६६ व निफ्टी ४७.७० अंकाने घसरला

Stock Market Opening Bell: ख्रिसमोत्तर सत्रात बाजारात घसरण सेन्सेक्स १८३.६६ व निफ्टी ४७.७० अंकाने घसरला

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात नवा ट्रिगर नसल्याने आज बाजारात जागतिक अस्थिरतेचा परिणाम दिसल्याने सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १८३.६६ व निफ्टी ४७.७० अंकाने घसरला आहे. सकाळच्या सत्रात क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ केमिकल्स, कंज्यूमर ड्युरेबल्स मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस, मेटल निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी, मिडिया, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, बँक निर्देशांकात झाली आहे. आज सकाळच्या सत्रात भूराजकीय अस्थिरतेच्या फटक्यामुळे सेल ऑफ होत असल्याची अधिक शक्यता असून युएस भारत यांच्यातील चर्चेतील विविध पैलू समोर येत असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा पत्करला आहे. ख्रिसमसनंतर सकाळच्या सत्रात घसरण झाली असला तरी बाजारात घरगुती गुंतवणूकदारांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ रेल विकास (५.००%),कॅस्ट्रॉल (४.३०%), ओला इलेक्ट्रिक (३.३१%), माझगाव डॉक (३.०१%), हिंदुस्थान कॉपर (२.८५%), लीला पॅलेस हॉटेल (२.६३%), कोचीन शिपयार्ड (२.५३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण ब्रेनबीज सोलूशन (२.२४%), आयईएक्स (२.१९%), स्विगी (१.८४%), जेबीएम ऑटो (१.७९%), ज्युपिटर वॅगन्स (१.०९%), सिटी युनियन बँक (१.०३%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (१.०३%), पीव्हीआर आयनॉक्स (०.९६%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रपूर्व परिस्थितीवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे हेड ऑफ प्राईम रिसर्च देवार्ष वकील म्हणाले आहेत की,'बुधवारी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येच्या कमी उलाढालीच्या सत्रात एस अँड पी ५०० आणि डाऊ जोन्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले.२०२५ मध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एआय (AI) स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे, एस अँड पी ५०० ने एका महिन्याहून अधिक काळात प्रथमच इंट्राडे विक्रमी उच्चांक गाठला.

तिन्ही प्रमुख निर्देशांकांनी सलग पाचव्या दिवशी वाढ नोंदवली, आणि एस अँड पी ५०० वार्षिक १८% परताव्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.गेल्या आठवड्यातील विक्रीच्या लाटेनंतर एआय-संबंधित शेअर्समध्ये झालेल्या पुनरुज्जीवनामुळे ही तेजी दिसून आली. ही विक्रीची लाट वाढलेल्या मूल्यांकनाबद्दल आणि नफा कमी करणाऱ्या भांडवली खर्चाबद्दलच्या चिंतांमुळे आली होती. पुढील वर्षी फेडकडून अंदाजे ५० बेसिस पॉइंट्सची व्याजदर कपात होईल, असे बाजारांना अपेक्षित आहे, तथापि जानेवारीमध्ये कपातीची शक्यता कमी आहे. अलीकडील आकडेवारी आर्थिक लवचिकतेची पुष्टी करते. आशियाई सत्रादरम्यान यूएस आणि युरोपीय इंडेक्स फ्युचर्समध्ये संमिश्र व्यवहार झाले.

सुट्ट्यांमुळे अनेक प्रादेशिक बाजारपेठा बंद असताना, जपान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर्सच्या नेतृत्वाखाली, आज आशियाई इक्विटीजमध्ये कमी उलाढालीत माफक वाढ झाली. भौगोलिक-राजकीय तणाव आणि मजबूत मागणीमुळे मौल्यवान धातूंनी शुक्रवारी आपली विक्रमी तेजी कायम ठेवली. स्पॉट चांदी प्रति औंस $७३.७८ च्या वर विक्रमी उच्चांकावर पोहोचली, सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदवली. बुधवारी निफ्टी ३५ अंकांनी घसरून २६१४२ अंकांवर बंद झाला.दैनंदिन आलेखावर तेजीचा उच्च-शिखर, उच्च-तळ (High Base) रचना असल्याने निफ्टीचा अल्प-मुदतीचा कल सकारात्मक राहिला आहे. घसरणीच्या बाजूने, २६००० ची पातळी नजीकच्या काळात आधार म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. वाढीच्या बाजूने, २६२४० ची पातळी तात्काळ प्रतिकार (Immediate Resistance) म्हणून काम करण्याची शक्यता आहे, त्यानंतर २६३३० ची पातळी येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >