३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा
हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी गुरुवार २५ डिसेंबर आणि बुधवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली होती. देशभरातील अनेक भागांत त्याचा परिणाम झाल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे.
ऑनलाइन डिलिव्हरीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. त्यामुळे या कंपन्यांवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स या संघटनेकडून सांगण्यात आले. मेट्रो शहरे आणि प्रमुख टियर-२ शहरांमधील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी आजच्या संपात सहभागी घेतल्याची माहिती देण्यात आली.






