पणजी: गोव्यातील मापुसा न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या पोलिस कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ केली असल्याची अपडेट समोर आली आहे. गौरव आणि सौरभ हे गोव्याच्या रोमियो लेन येथील बर्च नाईट क्लबचे मालक आहेत. क्लबला लागलेल्या आगीमुळे त्यांना १० दिवसाच्या पोलास कोठडीची सुनावण्यात आली होती. ज्याची मुदत आज संपली असली तरी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. सौरभ आणि गौरव लुथरा यांचे वकील पराग राव यांनी सांगितल्यानुसार, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करायचे असल्यामुळे या अतिरिक्त पोलीस कोठडीसाठी कोणताही विरोध दर्शवला गेला नाही. सध्या लुथरा ब्रदर्स अंजुना पोलिसांच्या ताब्यात आहेत. क्लबला आग लागली तेव्हा हे भाऊ प्रत्यक्ष स्थळी उपस्थित नसले तरी अंजुना पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या लक्षात राहणार आहे. त्यांनी काम केलेल्या ...
नाईट क्लब अग्निकांडाचा घटनाक्रम
गोव्यातील अर्पोरा गावातील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नाईटक्लबमधील 'ती' रात्र आपल्यासाठी शेवट ठरेल असा विचारही कोणी केला नव्हता. मात्र सिलेंडरच्या झालेल्या स्फोटाने २५ जणांवर घाला केला. या घटनेनंतर काही तासांमध्येच सौरभ आणि गौरव लुथरा थायलंडला पळून गेली होते. मात्र पसार झालेल्या लुथरा बंधूंविरुद्ध थायलंड सरकारने हद्दपारीची प्रक्रीया पूर्ण केली आणि त्यांना १७ डिसेंबर रोजी पुन्हा देशात आणण्यात आले.
लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते, तिथे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून गोवा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गोव्यात आणण्यात आले असून पुढील सर्व चौकशी गोव्यातच होत आहे.






