मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स्,आस्थापना, गृहसंकुल व इमारती,समुद्र किनाऱ्यांवर व अन्य ठिकाणी कार्यक्रम,स्वागत सोहळ्यांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे. यासाठी नियमित होणाऱ्या अग्निसुरक्षा तपासणी व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाकडून ही विशेष मोहिम २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये राबवण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेतंर्गत वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) अर्थात वरळी डोममध्ये मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जी दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये अग्निसुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या डोमला मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरळी डोममध्ये आग सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आलेल्या नाही.तसेच प्रवेश मार्गातील अडगळ आणि इतर अग्निशमन सुरक्षा कार्यान्वित नसणे तसेच योग्यप्रमाणात उपलब्ध नसणे असे निदर्शनास दिसून आल्याने वरळी डोमला आग प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली. वरळी डोममध्ये पुढील काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आलेल्या नोटीसच्या अनुषंगाने पुन्हा एकदा तपासणी करून पुढील कडक कारवाई केली जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत तथा वाढीव बांधकाम झाले असल्यास त्यावरही जी दक्षिण विभागाच्या इमारत कारखाना विभागाच्यावतीने कडक कारवाई केली जाईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये सध्याच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत अनेक रेस्टॉरंट तसेच पब्ज व मॉल्सची पाहणी करून त्याअंतर्गत अग्निसुरक्षेचे पालन केलेल्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड)