Friday, December 26, 2025

Stock Market: आठवड्याची अखेर अनपेक्षित घसरणीमुळे 'या' कारणास्तव सेन्सेक्स ३६७ व निफ्टी ९९ अंकाने घसरला

Stock Market: आठवड्याची अखेर अनपेक्षित घसरणीमुळे 'या' कारणास्तव सेन्सेक्स ३६७ व निफ्टी ९९ अंकाने घसरला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स ३६७.२५ अंकाने घसरत ८५०४१.४५ पातळीवर व निफ्टी ९९.८० अंकाने घसरत २६०४२.३० पातळीवर स्थिरावला आहे. दोन्ही बँक निर्देशांकातही किरकोळ घसरण कायम राहिली आहे. नवा ट्रिगर नसताना भूराजकीय अस्थिरतेचा फटका कमोडिटी बाजारासह शेअर बाजारालाही बसला आहे. त्यामुळे ख्रिसमसोत्तर आठवड्याची अखेर अनपेक्षित घसरणीने झाली आहे. खरं तर गुंतवणूकदारांना परवाच्या प्राईज करेक्शन नंतर वाढ अपेक्षित असली तरी युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर संदिग्धता, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात रूपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण, आयटी,मीडिया,ऑटो, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम, फायनांशियल सर्विसेस यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या पडझडीचा फटका भारतीय रिटेल गुंतवणूकदारांना बसला आहे. दरम्यान मेटल, एफएमसीजी, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे निर्देशांकाला किरकोळ आधार मिळाला. तसेच युएस ची एच१बी व्हिसा,टॅरिफ या धोरणाचा फटकाही क्षेत्रीय निर्देशांकात बसला. सातत्याने मेटल शेअर्समध्ये वाढ होत असली तरी कमोडिटी बाजारातील आज सोने चांदीत सर्वोच्च पातळीवर वाढ झाली आहे. व्यापक निर्देशांकातही निफ्टी १००, निफ्टी २००, मिडकॅप ५०, निफ्टी मिडकॅप १०० या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात दिसला आहे.

युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही डाऊ जोन्स, एस अँड पी ५००, नासडाक कंपोझिट निर्देशांकात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातही संमिश्रित कल कायम राहिला आहे. ए आय शेअर्समध्ये अस्थिरता, युएस बाजारातील टॅरिफची अनिश्चितता, सोने चांदीचे उच्चांकी दर व अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे सेट कंपोझिट, गिफ्ट निफ्टी, स्ट्रेट टाईम्स निर्देशांकात घसरण झाली असली तरी घसरलेल्या डॉलरसह मजबूत फंडामेंटलमुळे इतर निर्देशांकात वाढही झाली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक वाढ निकेयी २२५, तैवान वेटेड, कोसपी निर्देशांकात झाली आहे. भारतीय बाजारात लार्जकॅप शेअर्समध्येही संमिश्र प्रतिसाद राहिला असला तरी आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये आज मात्र घसरण दिसून आली आहे. दरम्यान काही प्रमाणात मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक झाली असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमधून काढल्याची शक्यता आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ रेल विकास (१२.२२%), एमएमटीसी (११.१६%), आयआरएफसी (१०.००%), हिंदुस्थान कॉपर (८.९५%), जीएमडीसी (७.९४%), रेलटेल कॉर्पोरेशन (८.९३%), करूर वैश्य बँक (५.०७%), एनबीसीसी (५.०८%), टिटागढ रेल (५.०५%) समभागात (Stocks) झाली असून सर्वाधिक घसरण एचएफसीएल (४.३१%), रिलायन्स पॉवर (४.२५%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (३.३९%), जीई व्हर्नोवा (२.८३%), जेबीएम ऑटो (२.७६%), एसीएमई सोलार होल्डिंग्स (२.५१%), होनसा कंज्यूमर (२.४५%), उषा मार्टिन (२.४२%), पीएनबी हाऊसिंग (२.३२%), पीव्हीआर आयनॉक्स (२.२८%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment