Friday, December 26, 2025

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळमधून विरोध प्रदर्शन, तोडफोड आणि झटापटीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी धार्मिक संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा येथे धर्मांतराच्या घटनेच्या निषेधार्थ ‘छत्तीसगड सर्व समाजा’ने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. दरम्यान, हरियाणातील गुरुग्राममध्ये हिंदू संघटनांच्या विरोधामुळे ख्रिसमस पार्टी रद्द करण्यात आली.

नवी मुंबईत युवकाला मारहाण

महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या दिघा परिसरात एका मोबाईल दुकानात घुसून अर्जुन सिंह या हिंदू युवकाला मारहाण करण्यात आली.अर्जुनने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ‘मला ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ नका’ असे लिहिले. यामुळे संतप्त झालेल्या काही जणांनी दुकानाची तोडफोड करत त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment