मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ३०० मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विधानसभेतील मतदार केंद्राप्रमाणेच केंद्र असतील. मात्र, महापालिका प्रभागांचा विचार करता विधानसभेप्रमाणेच मतदार केंद्र कायम ठेवतच तब्बल १९० मतदान केंद्राची वाढ केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत १० हजार १११ मतदान केंद्र होतेे, तर महापालिका निवडणुकीत सुमारे १० हजार ३०० मतदान केंद्र असतील असे महापालिका निवडणूक विभागाने स्पष्ट केले. यामध्ये ७०० सोसायट्यांमधील मतदान केंद्रांचा समावेश आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात येत असून यातील ११ लाख ०१ हजार ५०६ दुबार मतदारांपैंकी १ लाख ६८ हजार ३५७ दुबार मतदार आढळून आले. उर्वरीत ९ लाख ३३ हजार १५६ हे वेगवेगळ्या नावाचे होते. तर त्यातील १ लाख २६ हजार ६६० दुबार मतदारांच्या घरी प्रत्यक्ष जावून पाहणी करण्यात आली आहे. त्यातल ४८ हजार ६२८ दुबार मतदारांनी परिशिष्ट एक लिहून दिले. तर ७८ हजार १०५ दुबार मतदारांनी परिशिष्ट एक स्वीकारण्यास तथा भरुन देण्यास नकार दिला. या ११ लाख ०१ हजार दुबार मतदारांपैंकी २ लाख २५ हजार ५७२ मतदारांची नावे एकाच प्रभागातील होती, तर ८ लाख ३५ हजार ९३५ दुबार मतदारांची नावे वेगवेगळ्या विभागांमध्ये होती,अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिली आहे


येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापालिका निवडणूक मतदानासाठी यंदा १० हजार ३०० मतदान केंद्र निर्माण केली जाणार आहेत. तर विधानसभेत या मतदान केंद्राची संख्या १० हजार १११ एवढी होती. त्यामुळे विधानसभेच्या तुलनेत १९० मतदान केंद्रांची संख्या वाढली जाणार आहे. तर ७०० सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असतील. विधानसभेतील सोसायट्यांमधील मतदान केंद्र कायम ठेवण्यात आली असून नव्याने त्यात वाढ झालेली नसल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.



संवेदनशील मतदार केंद्र


मुंबईतील जे संवेदनशील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मतदान केंद्र ही संवेदनशील केंद्र म्हणून ओळखले जातात. त्यातच दहा पेक्षा अधिक मतदान केंद्र ही एकाच जागेवर असल्यास त्या मतदान केंद्रांना संवेदनशील मतदान केंद्र म्हणून निश्चित केले जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,