Thursday, December 25, 2025

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. स्मृतीचे लग्न संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलशी होणार होते. हे लग्न मोडल्याचे स्वतः स्मृतीने जाहीर केले आहे. या विषयावर जास्त न बोलता तिने 'माझ्यासाठी हा विषय बंद झाला आहे' अशी पोस्ट केली. यानंतर क्रिकेट खेळण्यात रमलेली स्मृती आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये गैरहजर राहणार आहे. स्मृतीच्या अनुपस्थितीवरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. लग्न मोडल्यानंतर स्मृतीने कोणत्या कार्यक्रमाला जावे आणि कोणत्या टाळावे याचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला सुरुवात केली आहे. खासगी आयुष्यावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता गृहित धरून स्मृतीने कार्यक्रमाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण कार्यक्रमातील संभाषणात स्मृतीचा उल्लेख असेल आणि चांगल्या हेतूनेच असेल. कॉमेडी आणि क्रिकेटचा अनोखा संगम या विकेंडला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या चौथ्या सीझनच्या नव्या एपिसोडमध्ये कॉमेडी आणि क्रिकेटचा अनोखा संगम पहायला मिळेल. नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आयसीसी विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत केले होते आणि आता विजयाची उत्सव कपिल शर्माच्या स्टेजवर हास्यविनोदासह साजरा होईल. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा एपिसोड शनिवार २७ नोव्हेंबर २०२५ रोजी टीव्हीवर दिसणार आहे. हा एपिसोड आनंद, मजा आणि राष्ट्रीय अभिमानाने भरलेला असेल. शोचे होस्ट चॅम्पियन्सचे आपल्या स्टेजवर स्वागत करत क्लासिक कपिल स्टाइलमध्ये हलकफुलके आणि आनंददायी वातावरण निर्माण करतील. एपिसोडमध्ये हरमनप्रीत कौरसोबत ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, हरलीन देओल, राधा यादव, प्रतीका रावल आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार उपस्थित असतील. नेटफ्लिक्सवर २७ डिसेंबरला संध्याकाळी ८ वाजता स्ट्रीम होणाऱ्या या एपिसोडमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ उपस्थित राहणार आहे. स्मृती ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या शनिवारच्या भागात दिसणार नाही. पण प्रोमोमध्ये स्मृतीच्या नावाचा उल्लेख स्वतः कपिल करणार आहे. हरमनप्रीतच्या ट्रॉफी उंचावण्यापूर्वीच्या भांगडा क्षणाचा उल्लेख करताना कपिल दिसेल. तोच सांगेल की, स्मृतीनेच सहकाऱ्यांना नाचण्यासाठी प्रोत्साहित केले होते. शो मध्ये जेमिमा मजेशीरपणे बोलताना दिसेल. हॅरी दीदी आमचे ऐकत नाहीत पण स्मृतीने सांगितले होते की जर भांगडा केला नाही तर मी आयुष्यभर बोलणार नाहीच असे बोलताना जेमिमा दिसेल.
Comments
Add Comment