नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. ही चाचणी २३ डिसेंबर २०२६ रोजी बंगालच्या उपसागरात करण्यात आली. चाचणीवेळी पाणबुडी विशाखापट्टणमच्या किनारपट्टीच्या परिसरात होती.
भारताच्या नौदलाने याआधी K-15 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानपर्यंतच हल्ला करण्यास सक्षम होते. पण K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चीनमधील मोठ्या भूभागावर हल्ला करण्यास सक्षम आहे. यामुळे -4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती मिळाल्यापासून पाकिस्तान आणि चीनची झोप उडाली आहे.
भारताच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
- आण्विक हल्ला करण्यास सक्षम
- अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून प्रक्षेपित करता येते
- ३५०० किमी मारक क्षमता (पल्ला)
- अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम






