Friday, January 16, 2026

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन दिवस शोध मोहीम राबवून सुरक्षा पथकांनी गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार केले. हिडमाच्या मृत्यूनंतर गणेश उइके हा नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता होता. सुरक्षा पथकांनी गणेश उइकेलाच माल्यामुळे आता नक्षलवादी कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे.

बेलघर पोलीस स्टेशन हद्दीतील गुम्मा वन क्षेत्रात झालेल्या चकमकीत दोन माओवादी नक्षलवादी ठार झाले. तर चकपड पोलीस स्टेशन हद्दीतील नारिग झोला वन क्षेत्रात झालेल्या दुसऱ्या चकमकीत आणखी तीन माओवादी नक्षलवादी ठार झाले.

नक्षलवादी गणेश उइकेवर १.१ कोटी रुपयांचे बक्षीस होते. गणेश उइके हा ओडिशातील नक्षलवादी संघटनेचा प्रमुख होता. गणेश व्यतिरिक्त चकमकीत सीपीआय माओवादी नक्षलवादी क्षेत्र समिती सदस्य बारी उर्फ ​​राकेश आणि दलम सदस्य अमृत यांचा मृत्यू झाला. बारी उर्फ ​​राकेश आणि दलम सदस्य अमृत या दोघांवर २३.६५ लाख रुपयांचे बक्षीस होते. एक महिला नक्षलवादीही चकमकीत ठार झाली पण तिची ओळख अद्याप पटलेली नाही.

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सुरक्षा दलाची २३ पथके, २० विशेष ऑपरेशन ग्रुप पथके, दोन CRPF पथके आणि एक BSF पथक यांनी संयुक्त मोहीम राबवली. सुरक्षा पथकांनी पाच नक्षलवादी ठार केले आणि शस्त्रसाठाही जप्त केला.

Comments
Add Comment