Thursday, December 25, 2025

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सौरभ भारद्वाज, संजय झा आणि आदिल अहमद खान कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी मुद्दाम द्वेषपूर्णपणे वर्तन करण्यात आल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 'आप'च्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी १७ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत नाताळचे प्रतिक असलेल्या सांताक्लॉजचे आक्षेपार्ह पद्धतीने चित्रिकरण करण्यात आल्याचा आरोप आहे. व्हिडीओत सांताक्लॉजला रस्त्यावर बेशुद्ध पडताना आणि राजकीय संदेश देण्यासाठी त्याचा आधार म्हणून वापर करताना दाखवण्यात आले होते. तसेच व्हिडिओमध्ये बनावट सीपीआर देताना दाखवून सांताक्लॉजची थट्टा करण्यात आली आहे, ज्यामुळे सेंट निकोलस आणि ख्रिसमसचे पावित्र्य दुखावल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर आहे.

Comments
Add Comment