Tuesday, December 23, 2025

राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा

जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका पंचायतीने १५ गावांतील महिला आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास मज्जाव केला आहे. पंचायतीचा हा निर्णय एखाद्या ‘तुघलकी’ फरमानासारखा असल्याची चर्चा आता रंगू लागली असून, २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पंचायतीने जारी केलेल्या आदेशानुसार, या १५ गावांतील महिलांना आता केवळ साध्या की-पॅड फोनचा वापर करता येईल. स्मार्टफोन्समुळे मुले बिघडतात आणि त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, असा दावा पंचायतीने केला आहे. लग्न समारंभ, शेजाऱ्यांच्या घरी जातानाही महिलांना मोबाईल सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया : पंचायतीच्या या अजब निर्णयाचे पडसाद सोशल मीडियावर उमटल्या. काही लोकांच्या मते, मुलांच्या आरोग्यासाठी आणि स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. बहुतांश नागरिकांनी याला महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे पाऊल म्हटले असून, आधुनिक काळात असा भेदभाव करणे चुकीचे आहे.

Comments
Add Comment