अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक
डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता असते ख्रिसमसची .लहानांपासून मोठ्यांपर्यंत अश्या सर्वाना आवडणारा हा ख्रिसमस.खिसमस म्हणजे आनंद, भेटवस्तु, सजावट आणि कुटुंबासोबत चालवलेला वेळ, ख्रिसमसच्या सुट्टीत अनेक लोक बाहेर फिरायला जातात, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात .गम्मत तर बघा या वर्षी ख्रिसमस ची तारीख ही २५ /१२/२५ आहे. ही तारीख या आधी १९२५ मध्ये आली होती आणि यानंतर थेट २१२५ मध्ये येणार आहे .या तारखेच्या वेगळेपणामुळे लोक फोटो, पोस्ट आणि आठवणी खास पद्धतीने जतन करत आहेत.
२५/१२/२५ ही तारीख विशेष का?
२५ डिसेंबरला येशु ख्रिस्तांचा वाढदिवस जगभर साजरा केला जातो. या वर्षीही सगळीकडे खिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ख्रिसमसची तारीख २५/१२/२५/असून दिवस आणि वर्ष या दोन्ही ठिकाणी २५ हा अंक दिसत असल्यामुळे या दिवसाला एक अनोखी ओळख मिळाली आहे.कारण अशी नंबर्सची अलाईनमेंट १०० वर्षांत एकदाच पाहायला मिळते,त्यामुळे सगळीकडे आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे . ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री लावलेले व त्यावर सुंदर असं डेकोरेशन करून सजवलेलं पाहायला मिळत आहे .
सगळ्यांच्या ऑफिस मध्ये किंवा शाळांमध्ये ख्रिसमस ट्री हे असते . विशेष म्हणजे या दिवशी सगळे सीक्रेट सांता म्हणून एकामेकांना गिफ्ट्स देतात. हा दिवस उत्साहात साजरा करतात .






