मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत . अनेकांची तर चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यावर लागतो तो म्हणजे चहा . यामध्ये पण काहींना दुधाचा चहा पिण्याची सवय असते तर कधी ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. परंतु उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी, पित्त, आंबट ढेकर इत्यादी पचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते.चहामध्ये ‘टॅनिन’ नावाचा नैसर्गिक घटक आढळून येतो, जो आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे.
चहा बनवताना त्यात चहा पावडर, साखर आणि दूध मिक्स करून चहा बराच वेळ उकळला जातो, यामुळे चहामधील अपचनीय रासायनिक संयुगे तयार होऊन चहाची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. चहामध्ये तयार झालेला विषारी घटक शरीर सहज पचन करत नाही. म्हणूनच आज आपण चहा योग्यरीत्या कसा बनवला पाहिजे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया
टॅनिन आणि प्रथिनांमधील रासायनिक प्रक्रिया:
चहाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या टॅनिन असते तर दुधामध्ये प्रथिने आढळून येतात. हे दोन्ही घटक एकत्र मिक्स झाल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. टॅनिन आणि दुधातील प्रथिने एकत्र मिक्स झाल्यानंतर रासायनिक प्रक्रिया घडते. हे घटक पचनासाठी अतिशय कठीण असतात. अपचनीय घटक लिव्हरमध्ये गेल्यानंतर नैसर्गिक पचनक्रिया होत नाही, ज्यामुळे वारंवार मळमळ, उलट्या आणि अपचन होते. तसेच सतत गरम केलेला दुधाचा चहा प्यायल्यामुळे अपचन होऊन आरोग्य बिघडते.
यावर उपाय म्हणजे दूध आधी उकळून घेणे:
वारंवार ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून दूध आणि चहाचे पाणी एकत्र उकळू नये. दूध आणि चहा वेगवेगळे गरम करून नंतर एकत्र करून प्यावे. चहा बनवताना सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चहा पावडर, साखर, आले किंवा वेलची घालून व्यवस्थित उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर चहा कपात ओतून वरून त्यात गरम केलेले दूध ओतून चहा प्यावा.
चहा खूप जास्त उकळण्याचे दुष्परिणाम:
काहींना सकाळी उठल्यानंतर खूप कडक गरम केलेला चहा पिण्याची सवय असते. चहाची पावडर गरम दुधात किंवा पाण्यत जास्त वेळ उकळवु नये. यामुळे टॅनिन आणि कॅफीनचे प्रमाण वाढून आरोग्य बिघडते. चहा सतत गरम करून प्यायमुळे पोटाच्या आतील थरांना हानी पोहचण्याची शक्यता असते. कमी वेळ उकळलेला चहा चवीला सौम्य लागतो पण आरोग्यासाठी कमी घातक ठरतो. त्यामुळे वारंवार गरम केलेला दुधाचा चहा पिऊ नये.






