Wednesday, December 24, 2025

गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी;  अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. यापुढे कोणत्याही क्षेत्रात गुटखा किंवा प्रतिबंधित पदार्थ आढळल्यास त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा किंवा वितरण सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनी सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना आदेश देत प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने होणारी विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >