Wednesday, December 24, 2025

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र

हा तर संधीसाधूंचा सत्ता पिपासूपणा, भाजपा नेते मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका मुंबई: मराठी माणसाने तुम्हाला वेगळे व्हायला सांगितले नव्हते. त्यावेळी कशासाठी वेगळे झालात आणि आता कशासाठी गळयात गळे घालत आहेत. त्यावेळी म्हणालात होतात की, मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. चार कारकून पक्ष चालत आहेत मग आज त्याच कारकूनांसोबत आणि बडव्यांसोबत हात मिळवणी कशासाठी करीत आहेत, असा सवाल करीत ठाकरेंचे एकत्रीत येणे हे संधीसाधूंचा सत्तापिपासूपणा आहे, मराठी माणसाच्या अस्मीतेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र अशी टीका भाजपा नेते मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज केली. दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर मंत्री शेलार यांनी आज मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांच्या वतीने काही सवाल उपस्थित केले. ते पक्षाला घेरणारे चार कारकून कोण, ते बडवे कोन याचे उत्तर द्या, आता मुंबईकर तूमचे लाव रे व्हिडीओ करणार आहेत. तूमचे जूने व्हिडीओ लावणार आहेत. त्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. ज्यावेळी मुंबईकरांनी मतरुपी आशिर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत त्यावेळी घाबरेलेल्या मनस्थितीतून दोन पक्ष एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्मीतेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. आज जागा जाहीर केल्या नाहीत. भिती वाटते का की एक भाऊ दुसऱ्या भावाला फसवतोय, असा सवालही मंत्री शेलार यांनी केला. राज ठाकरे म्हणाले की, उमेदवार पळवणारी टोळी शहरात फिरते आहे मग तुमचे निवडून आलेले उमेदवार ज्यांनी पळवले ते भाऊ जे तुमच्या बाजूला बसले आहेत ते काय टोळीचे म्होरके आहेत का? असा सवाल ही त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजोबांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला. या बद्दल आम्हाला सगळयांनाच अभिमान आहे पण सवाल आहे की, तुम्ही ज्या काँग्रेसने मराठी माणसावर गोळया झाडल्या त्या काँग्रेस बरोबर तुम्ही हातमिळवणी कशी केलीत. मराठी माणसाच्या रक्ताने जे हात तुमचे बरबटले आहे का असा सवालही त्यांनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, मनसे हा संपलेला पक्ष आहे मग आज कुणी कुणाला चवणप्राश दिले, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. असे आम्ही असंख्य प्रश्न विचारणार आहोत हे प्रश्न मुंबईकरांच्या मनातले आहेत. त्यामुळे दोन पक्ष एकत्र आले ते मराठी माणसासाठी नाही, मुंबईच्या विकासासाठी नाही, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर हा सत्तेसाठी केलेला सत्तापिपासूपणा आहे हा संधीसाधूपणा आहे. कारण आज जी पत्रकार परिषद रुपी १५ मिनिटाची शोर्टफिल्म रिलिज करण्यात आली ती रिलिज होताच फ्लॉप गेली आहे या शॉर्ट फिल्मध्ये मुंबईकरांसाठी काय होते, विकासाचे काय होते नविन कल्पना कुठे होत्या. मराठी माणसासाठी काही नाही केवळ दोन भाऊ एकत्र आले सत्ता, जागा एवढेच आज पहायला मिळाले. तुम्ही मुंबईच्या प्रत्येक विकास प्रकल्पांना विरोध केलात. म्हणून मुंबईकर आणि मराठी माणसाचा निर्णय झालाय. मुंबईकरांचे आधीच ठरलेय. म्हणून दोन्ही भावांनी जागा जाहीर करणार नाही, नाव जाहीर करण्यासाठी घाम पूसा, काँग्रेस सोबत नाही, घाम पूसा, अशा घाबरलेल्या मन स्थितीत येऊ नका, घाम पूसत पूसत येऊ नका, महायुती आणि आमचा पक्ष तयार आहे. त्यामुळे निधडया छातीने निवडणुकीच्या मैदानात या, घोडा मैदान तयार आहे मुंबईकर तयार आहे, असे खुले आव्हान ही त्यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >