मुंबईसाठी नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्यात तोफा धडाडणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याची सत्ता मिळवल्यानंतर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.


१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजपचे हे दोन्ही सर्वोच्च नेते मुंबईत प्रचाराचा धडाका लावणार आहेत. ७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असून, मुलुंडसह दोन महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडतील. ११ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ जानेवारी रोजी सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील मुंबईत असणार असून, ते पदयात्रा किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे.


पुण्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘युद्ध, प्रेम आणि निवडणुकीत सगळे माफ असते’, असे मिश्किल विधान करत, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व काही फेअर असल्याचे सुचित केले आहे.


मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मनसे विरूद्ध भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व काँग्रेस हे वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. उबाठा गटासाठी व मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली तर तिथून त्यांना बाऊन्स बॅक करणे खूप जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत आपला सगळा जोर लावण्याची शक्यता आहे. या हायव्होल्टेज प्रचार दौऱ्यांमुळे ही निवडणूक अटीतटीची व ऐतिहासिक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान