Wednesday, December 24, 2025

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. आजारी असल्यामुळे ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सुरुपसिंग नाईक हे १९८१ ते २०१९ या काळात राजकारणात सक्रीय होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते गांधी परिवाराचे निष्ठावान म्हणून ओळखले जात होते.

सुरुपसिंग नाईक यांचा अल्प परिचय

  1. सुरुपसिंग नाईक, नवागाव तालुका, नवापूर
  2. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते गांधी परिवाराचे निष्ठावान
  3. आणीबाणी नंतर इंदिरा गांधींची खांडबारा येथे सभा घेणारे आणि आदिवासी भागात काँग्रेसचे विचार पोहोचविणारे निष्ठावान कार्यकर्ते
  4. आदिवासीबहुल तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले, MIDC द्वारे रोजगार निर्मिती केली तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली.
  5. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे १९७२ ते १९८१ दरम्यान खासदार
  6. राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी १९८१ मध्ये दिला खासदारकीचा राजीनामा
  7. राज्यात १९८१ पासून काही काळ आदिवासी विकास समाज कल्याण मंत्री
  8. विधानपरिषदेत १९८१ ते ८२ दरम्यान राज्यपाल नियुक्त सदस्य
  9. नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत १९८२ मध्ये बिनविरोध निवड
  10. महाराष्ट्राच्या विधानसभेचे १९८२ ते २००९ दरम्यान सदस्य
  11. राज्यात १९८२ ते २००९ दरम्यान आदिवासी विकास विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन, परिवहन या विविध विभागांचे मंत्रिपद भूषविले
  12. विधानसभेच्या निवडणुकीत २००९ मध्ये पराभव
  13. विधानसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये विजय
  14. सक्रीय राजकारणातून दूर होत २०१९ मध्ये मुलगा शिरीष कुमार नाईक याला नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार केले
Comments
Add Comment