मुंबई: ज्यांनी सुधारित आयटीआर (Income Tax Return) भरले नाहीत त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत भरावी लागतील यावर आयकर विभागाने एक्सवर पोस्ट करत प्रलंबित करदात्यांना 'रिमायंडर' दिला आहे. दरम्यान आयकर विभागाने आतापर्यंत १५ लाख करदात्यांनी (Tax Payers) सुधारित आयटीआर भरल्याचेही यावेळी घोषित केले आहे. 'नज' (Nudge) या आपल्या मोहिमेद्वारे करदात्यांना माहितीची सत्यता पडताळून सुधारित पद्धतीने आयटीआर भरण्याची सूचना केली होती. काही करदात्यांनी सरकारच्या सूचीत नसलेल्या राजकीय पक्षाला डोनेशन दिले असताना त्यांच्या टॅक्स रिटर्न्ससाठी (परताव्यासाठी) अर्ज केला होता ज्यामध्ये आयटीआरमध्ये चूका झाल्याचे आयकर विभागाला आढळून आले होते.
आयकर विभागाने बनावट कामामध्ये गुंतलेल्या अपिरिचित (Unidentified) राजकीय पक्षांना देणग्या दिलेल्या करदात्यांना दावा केलेल्या कर परताव्यासाठी या नज मोहिमेतून (Nudge Campaign) सूचना केल्या होत्या. त्यांना आता करेक्शन करण्यासाठी ३१ तारीख अंतिम मुदत आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून फायलिंग करणाऱ्या करदात्यांना आर्थिक वर्ष २०२६ पासून लागू झालेल्या पद्धतीने नवीन आयटीआर भरावे लागणार आहे. यापूर्वी सीबीडीटी (Central Board of Direct Tax CBDT) विभागाने खोटे दावे केलेल्या करदात्यांची गुप्त माहिती संग्रहित केली होती.
Launch of a data-driven NUDGE campaign for AY 2025–26 encouraging taxpayers to voluntarily review deduction/exemption claims identified as potentially ineligible through risk analytics.
The outreach is advisory and reflects a trust-first approach, enabling voluntary correction,… pic.twitter.com/8pXqXL2PMe — Income Tax India (@IncomeTaxIndia) December 23, 2025
एका निवेदनात आयकर विभागाने म्हटले आहे की, 'चालू मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी १५ लाखांहून अधिक आयटीआर आधीच सुधारित करण्यात आले आहेत. तसेच २१ लाखांहून अधिक करदात्यांनी चालू आर्थिक वर्षात त्यांचे आयकर विवरणपत्र अद्ययावत केले असून २५०० कोटी रुपयांचा कर भरला आहे.
आयकर विभागाने पुढे म्हटले आहे की, संबंधित करदात्यांनी त्यांच्या आयटीआरचे पुनरावलोकन (Review) करावे, त्यांच्या वजावट आणि सूट दाव्यांची सत्यता पडताळून पाहावी आणि आवश्यक असल्यास, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत निर्धारित वेळेत त्यांचे विवरणपत्र सुधारित करावे, जेणेकरून या प्रकरणात पुढील चौकशी टाळता येईल. ज्या करदात्यांचे वजावट किंवा सूट दावे कायदेशीररित्या खरे आणि योग्यरित्या केलेले आहेत, त्यांना कोणतीही पुढील कारवाई करण्याची आवश्यकता नाही.'
उपलब्ध माहितीनुसार, जर आयटीआर दिलेल्या मुदतीत भरला नाहीतर आयकर कायदा कलम २३४ एफ अंतर्गत करदात्यांकडून दंड आकारला जाणार आहे. ५ लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना १०००० रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो तर ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना १००० रूपये दंड होणार आहे. दरम्यान तुम्ही मुदतीत नव्या आयटीआरची पूर्तता केली नाही तरी असेसमेंट वर्ष (३१ मार्च २५ पासून) पुढल्या २४ महिन्यांच्या आत नवा आयटीआर भरू शकता मात्र या दोन वर्षांच्या कालावधीत लागू असलेल्या करावर अतिरिक्त २५ ते ५०% अतिरिक्त दंडासह रक्कमेची परतफेड पूर्तता करावी लागणार आहे.
दरम्यान, जाणूनबुजून आयटीआर दाखल न करण्याच्या गंभीर प्रकरणांत कारावासही होऊ शकतो विशेषतः जर कर थकबाकी २५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुरूंगवासही होऊ शकतो. या खटल्यात ३ महिने ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे वेळेत आयटीआर भरला न नसेल तर आताच भरा असाही सल्ला आयकर विभाग वेळोवेळी देत असतो.






