मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसात सुमारे ७ हजार उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी अर्ज भरण्याचा श्री गणेशा झाला आहे आणि बुधवारी ०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी, पहिल्या दिवशी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण मिळून ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले होते. तर दुस-या दिवशी म्हणजे बुधवारी, एकूण २ हजार ८४४ नामनिर्देशन पत्रे वितरित झाली आहेत. दुसऱ्या दिवशी घाटकोपर आणि अंधेरी भागातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या, गुरूवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी नाताळ निमित्त सार्वजनिक सुटी असल्याने नामनिर्देशन पत्रे दिली जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ०५ पर्यंत आहे.
उमेदवारी अर्ज विक्री आणि कंसात भरलेले अर्ज
ए + बी +ई विभाग - १०९ सी + डी विभाग - ५६ एफ उत्तर विभाग - ९८ एफ दक्षिण विभाग - ८३ जी उत्तर विभाग - २८६ जी दक्षिण विभाग - ५२ एल विभाग (RO-16) - १११ एल विभाग (RO-17) - ७८ एम पूर्व विभाग - ३४० एम पश्चिम - १७४ एन विभाग - ७७/(१ प्राप्त) एस विभााग - १०६ टी विभाग - ९७ एच पूर्व विभाग - ९४ एच पश्चिम विभाग - १४६ के पश्चिम विभाग - १९३ के पूर्व + के पश्चिम विभाग - २३२/(१ प्राप्त) पी दक्षिण विभाग - ७१ पी उत्तर विभाग - १२० पी पूर्व विभाग - १२८ आर दक्षिण विभाग - ९० आर मध्य विभाग - ६० आर उत्तर विभाग - ४३ एकूण - २८४४






