Tuesday, December 23, 2025

कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेचा १८ जानेवारीपर्यंत ब्लॉक

कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेचा १८ जानेवारीपर्यंत ब्लॉक

मोठ्या प्रमाणावर लोकल रद्द होणार

बेस्टला ज्यादा बस सोडण्याची रेल्वेची विनंती

मुंबई : सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे कांदिवली-बोरिवली विभागावर ३० दिवसांचा मोठा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक २० डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून सुरू झाला असून, १८ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्यादा बेस्ट बस उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बेस्ट उपक्रमास विनंती केली आहे.

रेल्वेच्या या कामात कांदिवली आणि बोरिवली स्थानकांवर ट्रॅक स्लीव्हिंग आणि अनेक क्रॉसओवर घालणे आणि काढून टाकणे समाविष्ट आहे. प्रमुख अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांचे काम केले जाईल, ज्यामुळे रेल्वेच्या कामकाजावर परिणाम होणार असून परिणामी, काही उपनगरीय, प्रवासी आणि मेल व एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होईल. या कालावधीत पाचव्या मार्गावरील प्रवासी गाड्यांचे कामकाज स्थगित केले जाणार असून आणि इतर मार्गांवर वेगाचे निर्बंध लागू राहतील. पाचव्या मार्गावर धावणाऱ्या सर्व मेल व एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. हा ब्लॉक येत्या २५ डिसेंबर या कालावधीत दररोज रात्री ११ ते सकाळी ४.३० पर्यंत असेल. तसेच २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत हा मेजर ब्लॉक अधिक तीव्र स्वरूपाचा असून, दररोज सुमारे ३५० लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >